Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : ग्रामस्थांचा अवैध व्यवसायांवर हल्लाबोल; हातभट्ट्या केल्या उध्वस्त, प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त

Nevasa Ahmednagar News : अनधिकृतपणे हातभट्ट्या सुरु होत्या आणि याठिकाणी खुलेआम दारूची विक्री केली जात होती. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करत अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

नेवासा (अहमदनगर) : गावात सरासपणे अवैधधंदे सुरु होते. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करत हे अवैध धंदे बंद (Ahmednagar) करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अवैध व्यवसायांवर हल्लाबोल करत हे धंदे उध्वस्त केले. हा प्रकार नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव या गावात घडला आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा (Nevasa) तालुक्यातील बेल पिंपळगाव येथे ही घटना घडली आहे. नेवासा तालुक्यातील पिपंळगाव या गावात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरु होते. अनधिकृतपणे हातभट्ट्या सुरु होत्या आणि याठिकाणी खुलेआम दारूची विक्री केली जात होती. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करत अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नव्हते. यामुळे ग्रामस्थांनीच एकत्र येत या अवैध धंद्यावर हल्लाबोल केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दारू विक्रीच्या दुकानांना लावली आग 

संतप्त ग्रामस्थांनी आज अवैध धंद्यावर मोर्चा वळविला होता. यात तीन हातभट्टया गावकऱ्यांनी उध्वस्त केल्या. तसेच संतप्त ग्रामंस्थानी गावठी दारूच्या टपऱ्यांना आग लावत उध्वस्त केल्या. ग्रामस्थ आक्रमक झाले असल्याने त्यांनी अवैध धंदे करणाऱ्या दोघांना मारहाण देखील केली.  तसेच आठ दिवसात कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास उपोषण करण्याचा इशारा सरपंच कृष्णा शिंदे यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT