Ahmadnagar Rahuri Crime Saam Tv
महाराष्ट्र

भाऊच बनला भावाचा वैरी; दारुच्या नशेत कुऱ्हाडीने मोठ्या भावाची हत्या

अहमदनगरमध्ये एका लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची कुर्‍हाडीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातल्या राहुरी (Rahuri) तालुक्यातील पिंपळगाव फूनगी गावात एक भयानक घटना घडली आहे. येथे एका लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची (Young Brother Killed Older Brother) कुर्‍हाडीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राथामिक माहितीनुसार, घरगुती वादातून ही हत्या झाली आहे. राहुल लोखंडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून अमोल लोखंड असं मारेकरी भावाचं नाव आहे. सोमवारी (16 मे) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Ahmadnagar Rahuri Crime Young Brother Killed Older Brother)

मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फूनगी गावात राहणारा आरोपी अमोल हा सोमवारी रात्रीच्या सुमारास घरी दारू पिऊन आला. यावेळी घरात उपस्थित असलेला आरोपीचा मोठा भाऊ राहुल मोठा याच्यासोबत त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी अमोल याने जवळ असलेल्या कुर्‍हाडीने राहुलच्या डोक्यात वार केले. यामध्ये राहुल हा गंभीर जखमी झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने राहुलला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डोक्यात कुऱ्हाड लागल्याने अतिरक्तस्राव होऊन वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी अमोल याला अटक केली. दारूच्या नशेत धुंद असलेल्या लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याने परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT