Prabhavati Ghogre vs Radhakrishna Vikhe Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Politics: गावात डरकाळ्या फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा; सरपंच महिला विखे पिता-पुत्रावर कडाडल्या

Prabhavati Ghogre vs Radhakrishna Vikhe: "सरकारला शेतीचं अर्थकारण समजून सांगणं हे विधिमंडळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार आणि खासदारांचे काम आहे", असं म्हणत सरपंच प्रभावती घोगरे यांनी विखे पिता-पुत्रांचे चांगलेच कान टोचले

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही शिर्डी

Ahmednagar Rahta Latest News

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय फसवा असून कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णत: उठवली पाहिजे, असं म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करण्यात आलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या फोटोंवर कांदा ओतून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विखे-पाटलांच्या विरोधक प्रभावती घोगरे यांनी कांदा निर्यात बंदीवरून विखे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली.  (Latest Marathi News)

"सरकारला शेतीचं अर्थकारण समजून सांगणं हे विधिमंडळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार आणि खासदारांचे काम आहे", असं म्हणत सरपंच प्रभावती घोगरे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार सुजय विखे यांचे चांगलेच कान टोचले.

"तुम्ही आमचे प्रश्न संसदेत आणि विधीमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. गावात लुडबुड करायची आणि गावात डरकाळ्या फोडायच्या यापेक्षा शेतकऱ्यांसाठी सभागृहात डरकाळी फोडा", अशी टीका सरपंच घोगरे यांनी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

कोण आहेत प्रभावती घोगरे?

प्रभावती घोगरे या लोणी खुर्द गावाच्या विद्यमान सरपंच आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कट्टर विरोधक तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय अशी घोगरे यांची ओळख आहे. प्रभावती घोगरे यांचे सासरे स्वर्गीय चंद्रभान घोगरे हे 1978 साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये शिर्डी मतदासंघांचे पहिले आमदार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT