Ahmadnagar Kopargaon News  Saam TV
महाराष्ट्र

Ahmadnagar News : दुर्दैवी! गोदाकाठी कपडे धुवायला गेलेल्या मावशी-भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू

दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना कोपरगाव तालुक्यात भयंकर घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे, साम टीव्ही

कोपरगाव/अहमदनगर : दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmadnagar) कोपरगाव तालुक्यात भयंकर घटना घडली. तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीवर काळाने घाला घातला. कपडे धुत असताना पाण्यात बुडून मावशीसह भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (26 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास घडली आहे. (Ahmadnagar News Today)

या दुर्दैवी घटनेने कान्हेगावसह कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अर्चना सोनवणे (वय ३५ वर्षे, राहणार नाशिक) आणि गौरी शिंदे (वय १८ वर्षे, राहणार म्हसरुळ नाशिक) असे मयत झालेल्या मावशी आणि भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्चना सोनवणे आणि गौरी शिंदे या दोघी कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे दिवाळीच्या सुट्टी निमित्त मंगेश चव्हाण यांच्या येथे मामाच्या गावी आल्या होत्या. आज सकाळी गोदावरी नदीला पाणी असल्याने गावातील काही महिला आणि एक मुलगा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी मावशी आणि भाचीचा पाय घसरून ते नदी पात्रात पडले.

त्यांना वाचवण्यासाठी इतर 3 महिलांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडणार असल्याचे समजल्यावर जवळच असलेल्या एका मुलाने पाण्यात उडी मारून तीन महिलांना वाचवले. मात्र, या दोघींनाही वाचवण्यात त्याला अपयश आले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी कान्हेगाव परिसरात पसरल्यानंतर अनेकजण नदीकाठी पोहोचले.

स्थानिक ग्रामस्थांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाण्यातुन बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघींना त्यांना मृत घोषित केले. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT