Sangamner Acid Attack Saam
महाराष्ट्र

महाराष्ट्राला लाज आणणारी घटना! सहावीच्या मुलीवर अॅसिड हल्ला; भाजपनं कुटुंबाला दिला शब्द, चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

Sangamner Acid Attack : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Namdeo Kumbhar

minor schoolgirl acid attack case in Sangamner Maharashtra full details : अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्राला लाज आणणारी संतापजनक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला झाल्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावात मंगळवारी ही घटना घडलीय. मुलगी शाळेतून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अॅसिड फेकलं. अॅसिड फेकल्यानंतर आरोपी फरार झालाय. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु करण्यात आलाय. जखमी मुलीवर लोणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी सुरु केलीय. अॅसिड हल्ला प्रकरणावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

...तर मुलीच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी होणार

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्याची घटना मंगळवारी घडली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे. जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस आरोपीचा शोध घेताय. घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे. तर जखमी मुलीच्या चेहऱ्यावर आज प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

भाजपची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या चित्रा वाघ

संगमनेरमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. मुलीच्या कुटुंबियांसोबत बोलणं झाल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितले. शासनाकडून सर्वोत्तम वैद्यकीय मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितलं. कुटुंबासोबत बोलणं झालं असून सर्वतोपरी सहकार्याचा शब्द दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. त्याशिवाय आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथकं तैनात केल्याचेही त्यांनी सांगितलं.

तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. शासन कोणतीही तडजोड करणार नाही. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडून संबंधित यंत्रणांना सुचना दिल्या जात आहेत. महिलां व बालकांच्या सुरक्षेबाबत Zero Tolerance हीच आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan : मी सनातनी...; केदारनाथ-बद्रीनाथला जाण्यासाठी सारा अली खानला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, कोणी घेतला निर्णय?

Maharashtra Weather: मुंबईसह राज्यात पाऊस कोसळणार, वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Pune Tourism : २०० हून अधिक लेणी एकाच ठिकाणी, 'हे' ऐतिहासिक पर्यटन स्थळ जपतेय प्राचीन वास्तुकलेचा वारसा

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

Price Hike: कपडे, शूज ते कार-फ्रीज... १ एप्रिलपासून काय काय महागणार, वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT