Ahilyanagar Protesters Clashing With Police During Rangoli Dispute Saam Tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Clash: अहिल्यानगर का पेटलं? धार्मिक तणाव का निर्माण झाला?

Ahilyanagar Violence: अहिल्यानगरमध्ये धार्मिक धृवीकरणाचं लोण पसरलंय.. अहिल्यानगरमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.. तर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय... अहिल्यानगर शहर पेटवण्याचे कुणाचे मनसुबे आहेत?

Omkar Sonawane

पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय.. अहिल्यानगरच्या कोटला परिसरात... अज्ञात व्यक्तीनं माळीवाडा भागात बारा तोटी कारंजासमोर काढलेल्या रांगोळीमुळे मुस्लीम समाज आक्रमक झाला आणि त्यानंतर जमावानं संभाजीनगर महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन सुरु केलं...

समाजकंटकानी मुस्लीम धर्मगुरुचं नाव रस्त्यावर लिहलं..त्यामुळे तणाव निर्माण झाला.. मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको केला.. त्यानंतर रास्ता रोके करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला...

दरम्यान मुस्लीम धर्मगुरूच्या नावे रांगोळी काढणाऱ्या अज्ञाताला पोलिसांनी ताब्यात घेतलयं.. तसचं आंदोलनादरम्यान पोलिसांवर आणि वाहनांवर दगडफेक करणाऱ्या 30 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं..या घटनेत सात पोलीस किरकोळ जखमी झालेत..

अहिल्यानगर पोलिसांनीही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत, जिल्ह्यात शांततेचं आव्हान केलयं.. त्यातच मुस्लीम समाजानं रांगोळीच्या मुद्द्वयावरून तर हिंदूत्ववादी संघटनांनी पोस्टबाजीवरून टीका केलीय..

आधीच पोस्टरबाजीवरून देशातील काही भागात तणाव निर्माण झालाय..समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा गोष्टींचा सगळ्यांनीच निषेध करायला हवा.. आणि यासारख्या घटनेतून मोठा वाद होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनानंही कठोर पावलं उचलायला हवीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT