sharad pawar ajit pawar ncp x
महाराष्ट्र

Politics: उत्तर महाराष्ट्रात अजित पवारांकडून शरद पवारांना धक्का, बड्या नेत्यासह मुलाने हातात घातलं 'घड्याळ'

Arun Tanpure Joins Ajit Pawars NCP: राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे आणि त्यांचा मुलगा हर्ष तनपुरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि त्यांचे संचालक चिरंजीव हर्ष तनपुरे यांनी शरद पवारांची साथ सोडली. तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा झटका मानला जात आहे.

अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान तनपुरे पिता-पुत्रांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे ते शरद पवार गटातच राहणार अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राहुरी तालुक्यातील अहिल्यानगरमधील डॉ. तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाने २१ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. या विजयामागे अरुण तनपुरे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्व होते. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे राजू शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभव झाला होता.

सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या तनपुरे कारखान्याला पुन्हा कार्यरत करणे हे संचालक मंडळापुढील आव्हान आहे. लवकरच हा कारखाना सुरू व्हावा अशी सभासदांची इच्छा होती. त्यानुसार हा कारखाना आपण सुरू करू अशी ग्वाही अरुण तनपुरे यांनी निवडणुकीवेळी दिली होती. त्यामुळे कारखाना सुरू होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत मिळेल, अशी अपेक्षा सभासदांमध्ये आहे.

अरुण तनपुरे यांच्या पक्षप्रवेशामुळे राहुरीत अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे राजकीय उलटफेर बघायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील आता अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात? याकडे राहुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : अर्वाच्य शिवीगाळ अन् झिंज्या उपटून आपटलं, नंतर पोटात लाथाबुक्क्या; परप्रांतीयाकडून मराठी तरुणीला बेदम मारहाण, VIDEO

Honey Trap: हनीट्रॅप महामंडळाचे अध्यक्ष 'महाजन'? उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप|VIDEO

Urfi Javed: 'फशननिस्टा' उर्फी जावेदचं खरं वय ऐकून थक्क व्हाल!

Tuljapur Crime News : तुळजापूरात खळबळ; मुलासारखे सांभाळले त्यानेच केला घात; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली महिलेची हत्या

Aloo Jilebi: काही मिनिटांत घराच्या घरी तयार तयार करा आलू जिलेबी; लहानांपासून-मोठ्यांना आवडेल कुरकुरीत जिलेबी

SCROLL FOR NEXT