Sangamner News Saam tv
महाराष्ट्र

Sangamner News : माळरानावरील शाळेत फुलवली परसबाग; शिक्षक दाम्पत्याचा अनोखा उपक्रम, परसबागेतील फळांचा पोषण आहारात समावेश

Ahilyanagar news : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या घारगाव परिसरातील लहूचा मळा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा अगदी खडकाळ माळरानावर आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यात खडकाळ माळरानावर असलेल्या प्राथमिक शाळेत शिक्षक दांपत्याने विद्यार्थ्यांच्या सहभागातून परसबाग फुलविली आहे. या परसबागेत पिकणारा सेंद्रिय भाजीपाला विद्यार्थ्यांच्या दैनंदिन पोषण आहारासाठी वापरला जात आहे. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शेतीचे देखील ज्ञान मिळत असल्याने शिक्षक दाम्पत्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या घारगाव परिसरातील लहूचा मळा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. लहुचा मळा शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून ही शाळा अगदी खडकाळ माळरानावर आहे. अर्थात दुष्काळी भाग असल्याने येथे फारसे पिकत नाही. मात्र शाळेतील रोहिदास गाडेकर आणि आशा गाडेकर या शिक्षक दाम्पत्याने शाळेचे रुपडेच पालटून टाकले आहे. 

परसबागेसाठी सर्व खर्च शिक्षक दाम्पत्याचा 

विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेच्या आवारात सेंद्रिय परसबाग तयार केली आहे. या परसबागेत मेथी, पालक, शेपू, लसून, गाजर, भोपळा, घेवडा, गवार, भेंडी, टोमॅटो, कांदा, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगी आदी फळभाज्यांसह शंभरहून अधिक भाजीपाल्याची पिके लावली आहेत. इतकेच नाही तर परसबागेत पिकणाऱ्या भाज्या आणि फळांचा वापर हा मुलांना रोज दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये समावेश केला आहे. परसबागेसाठी आवश्यक खर्च गाडेकर शिक्षक दाम्पत्याने स्वतः केला आहे. 

स्पर्धेत शाळेचा दुसरा क्रमांक 

ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांचे शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य मिळत आहे. माळरानावर पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना शिक्षक दाम्पत्याने परसबाग तसेच वृक्ष लागवडीचे धाडस केले. यामुळे ही शाळा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२४-२५ मध्ये झालेल्या शालेय परसबाग स्पर्धेत लहुचा मळा शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक देखील मिळाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT