Ahilyanagar News Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News : राम शिंदे यांचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाच आव्हान; फेर तपासणीवरून रोहित पवारांची टीका

Ahilyanagar news : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल देण्यात आला आहे. नंतर मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएम घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: विधानसभा निवडणुकीत कर्जत- जामखेडमधील भाजप उमेदवार राम शिंदे यांनी फेर तपासणी करण्याची मागणी करत एक प्रकारे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले असल्याची टीका रोहित पवार यांनी रॅम शिंदे यांच्यावर केली आहे. 

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीला कौल देण्यात आला आहे. नंतर मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएम घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी याविरोधात अर्ज करून पडताळणी करून घेण्याचे ठरविले होते. मात्र नगर जिल्ह्यात भाजपचे कर्जत-जामखेडमधील उमेदवार राम शिंदे यांनी देखील फेरतपासणी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना (Rohit Pawar) रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

ईव्हीएममध्येच गोंधळ 

मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीनमध्ये गोंधळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र व्हीव्हीपॅटमध्ये काही गोंधळ आहे; असं मला वाटत नाही. मात्र ईव्हीएम मशीनमध्ये नक्कीच गोंधळ असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

अण्णा हजारेंना खोचक टोला 
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव ईव्हीएम मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलनाला बसले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबा आढाव यांच्या सारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचावी म्हणून अशा पद्धतीने आंदोलन करत आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाही. ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील; असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT