Prajakt Tanpure Saam tv
महाराष्ट्र

Prajakt Tanpure : तर जनतेने महायुती सरकारवर विश्वास कसा ठेवावा; छगन भुजबळ यांच्या ईडी विषयावर प्राजक्त तनपुरे यांनी साधला निशाणा

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या ईडी बाबतच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात क्रिया प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहुरी (अहिल्यानगर) : केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी होतोय. पण आता त्यांच्याच सरकारचे मंत्री याबाबत सांगत असतील, तर जनतेने महायुती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा? असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीत (Chagan Bhujabal) छगन भुजबळ यांच्या ईडी बाबतच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात क्रिया प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. ईडी कारवाईला सामोरे जात असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी देखील विषयावर भाष्य केले आहे. 

संविधानानुसर ईडी ही स्वायक्त संस्था असून तिची स्वायक्तता धोक्यात आणून फक्त स्वतःच्या फायद्याकरिता सत्ताधारी पक्ष यंत्रणांचा वापर करत आहेत. मला देखील ईडीची नोटीस आली आणि मी त्या नोटिशीला सामोरे गेलो. जे प्रश्न ईडी अधिकाऱ्यांनी विचारले त्याची मी उत्तरे दिली. याबाबत कोर्टामध्ये तारीख चालू आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्यावर बोलणे उचित नाही. मात्र सरकारमधील मंत्री जर ईडीबाबत खुलासे करत असतील; तर जनतेने महायुती सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? अशी प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT