Balasaheb Thorat Saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thorat : सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती टिकून; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर निशाणा

Ahilyanagar News : रमी गेम खेळण्याबाबत माणिकराव कोकाटे चुकले मान्य आहे. मात्र इतर मंत्र्यांच्या अनेक गोष्टी सुरू आहे; त्याकडे कुणाचे लक्ष नाही. त्याबद्दल प्रसारमाध्यमात हवी तेव्हढी चर्चा नाही

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : तीन पक्ष मिळून राज्यात महायुतीने सत्ता स्थापन केली. मात्र मंत्रिमंडळात असलेल्या महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय नसून खूप अविश्वास आणि गोंधळाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती टिकून असल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 

अहिल्यानगरच्या संगमनेर येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीवर निशाणा साधला आहे. मंत्री मंडळात समन्वय नाही, तर लाथाळ्या सुरू आहेत. निधीवरून घोटाळे सुरू असून नगरविकासचा निधी मुख्यमंत्री ताब्यात घेणार असल्याच्या चर्चा आहेत. महायुतीत एकमेकांवर अविश्वास आणि गोंधळाचे वातावरण असून फक्त सत्तेच सिमेंट आहे म्हणून टिकलेत.

महाराष्ट्राची अधोगती झाल्याचे चित्र
आज महाराष्ट्राची अधोगती झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कारण कुणी कसंही वागतंय, काहीही बोलतंय. टारगट वृत्तीचे लोक मोठ्या आणि वडीलधाऱ्या माणसांची इज्जत घेत आहेत. आमदारच नाहीत तर त्यांचे भाऊ देखील गोळीबार करायला लागले आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण, विधीमंडळात गुंडांकडून दादागिरी हे सगळं पाहण्यास मिळत असून महाराष्ट्राच्या जनतेवर हे सगळं बघण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा 

रमी गेम खेळण्याबाबत माणिकराव कोकाटे चुकले हे मान्य आहे. मात्र इतर मंत्र्यांच्या अनेक गोष्टी सुरू आहे; त्याकडे कुणाचे लक्ष नाही. काही स्कँडल पुढे येतात, मात्र त्याबद्दल प्रसारमाध्यमात हवी तेव्हढी चर्चा नाही. टेंडरमध्ये हजारो कोटींचे घोटाळे केले जात आहेत. तसेच ज्या मंत्र्यांचे उद्योग मिडीयात आले त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. मात्र इतर मंत्र्यांचे जे उद्योग सुरू आहेत, त्यांना रोखणार की नाही? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना मुभा दिली आहे का? असा सवाल देखील थोरात यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT