Shrirampur Police Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Police : श्रीरामपूरमध्ये ड्रग्ज पाठोपाठ लाखो रुपयांचा गांजा जप्त; आलिशान गाडीतून तस्करी, सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

Shrirampur News : अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे समोर येत आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात जवळपास १४ कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे. हि घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री लाखो रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहे. शिवाय सलग दोन दिवसांच्या कारवाईमुळे श्रीरामपूर अमली पदार्थांचे हब झाले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे समोर येत आहे. श्रीरामपूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मोठी कारवाई करत १३ कोटी ७५ लाख रुपये किंमतीचा ड्रग जप्त केल्याची कारवाई करण्यात आली होती. यानंतर रात्री पुन्हा एकदा गांजाची तस्करी केली जात असताना कारवाई करण्यात आली. 

आलिशान गाडीतून तस्करी 

श्रीरामपूर शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा आणखी एक मोठी कारवाई करत २०१ किलो गांजा जप्त केला. एका आलिशान गाडीतून गांजाची तस्करी केली जात होती. मात्र पोलिसांनी सापळा रचत गांजासह जवळपास ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र श्रीरामपूर परिसरात सलग दोन दिवस अमली पदार्थांचा मोठा साठा सापडल्याने श्रीरामपूर आमली पदार्थांचे हब झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

साताऱ्यात अडीच लाखांचा गांजा जप्त
सातारा
: सातारा शहर परिसरात दुचाकीवरुन गांजा घेवून जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) एकाला पकडले आहे. अतुल धनाजी भगत (वय २७) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संशयित दुचाकीवरून गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत २ लाख ६५ हजार ५०० रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT