Ahilyanagar Four suspected GBS patients SaamTv
महाराष्ट्र

GBS Virus : नगरमध्ये GBS व्हायरसचे पुन्हा ४ संशयित रुग्ण, प्रशासन अलर्ट मोडवर

Ahilyanagar GBS Virus : जिल्हा रुग्णालयात एक अल्पवयीन मुलगी जीबीएस संशयित आढळल्याने तिला तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आलं आहे. सदर मुलगी ही जिल्ह्याबाहेरील असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहिल्यानगर : जीबीएस नावाच्या आजाराने महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये थैमान घातले आहे. त्यातच, आता अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएसचे चार रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. हे चौघंही रुग्ण शहराबाहेरील असून एकाला पुण्याच्या ससूनमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर इतर तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

जिल्हा रुग्णालयात एक अल्पवयीन मुलगी जीबीएस संशयित आढळल्याने तिला तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आलं आहे. सदर मुलगी ही जिल्ह्याबाहेरील असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर, शहरातील खासगी रुग्णालयात तीन संशयित रुग्ण आढळल्याची माहिती पालिकेला मिळाली आहे. त्या तिघांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत अहिल्यानगरमध्ये आढळले आहे. खासगी रुग्णालयात आढळलेले रुग्ण आष्टी, वाकोडी आणि राहुरी तालुक्यातील आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या शतकेपार पार

दरम्यान, पुण्यात जीबीएसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.जीबीएस सिंड्रोमचे पाच नवीन रुग्ण आढळल्यानंतर, महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १६३ वर पोहोचली आहे. विभागाच्या अहवालात पुण्यातून सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. फक्त ८ रुग्ण शेजारील जिल्ह्यातील आहेत. आज मंगळवारी नवीन मृत्यूची नोंद झाली नसली तरी आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, आता डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता धोका टळलेला आहे, असं उपस्थित डॉक्टरांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT