GBS Symptoms: पनीर, भात खाणार तर जीबीएस होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

GBS Symptoms : सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, त्यात पनीर खाल्ल्याने जीबी सिंड्रोम होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.
GBS Symptoms
GBS Symptoms google
Published On

तुम्ही भात खाता का? पनीरची भाजी खाता का? हे आम्ही का विचारतोय ते बातमी पाहिल्यावर तुम्हाला कळेल. कारण, भात, पनीर खाल्ल्याने जीबी सिंड्रोम होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. मात्र, या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात

जीबीएसने राज्यभरात पाय पसरवलेयत.जीबीएसमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय.त्यामुळे राज्यभरात याच जीबीएसने दहशत पसरवलीय. त्यातच आता पनीर आणि भात खाल्ल्याने जीबीएसचा धोका वाढतो असा दावा करण्यात आलाय. यामुळे आणखी टेन्शन वाढलंय...जीबीएस हा जीवघेणा असल्याने या दाव्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय...व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

पनीर, भाताचा आहारात समावेश करू नका. जीबीएस विषाणूचा संसर्ग होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने हा जीवाणूची लागण होते. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेँणं गरजेचं आहे.जीबीएस काय आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, त्याची लक्षणं काय आहेत तेही पाहुयात.

जीबी सिंड्रोमची लक्षणे

हात आणि पाय सुन्न होणे

हात आणि पायांना मुंग्या येणे

स्नायूंची कमजोरी

श्वास घेण्यात समस्या

जीबीएस सिंड्रोमची ही लक्षणं आहेत. त्यामुळे ही लक्षणं आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र, भात, पनीरमुळे जीबीएसचा धोका आहे का? हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, भात हा प्रत्येकाच्या ताटात असतो.सगळेच भात खातात.त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.याबाबत अधिक माहिती जीबीएसवर उपचार करणारे डॉक्टर देऊ शकतात.त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले.त्यांना मेसेज दाखवून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

GBS Symptoms
Walking Benefits: वॉक करताना इअरफोन लावणं फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

तांदूळ, पनीर पदार्थात जास्त बॅक्टेरिया असतात यात तथ्य नाही

खाद्यपदार्थ शिळा होत गेला की त्यात बॅक्टेरीया वाढतो

भात, पनीर ताजे असतील तर खाण्यात काहीच हरकत नाही

नॉनव्हेज पदार्थ शिळा किंवा पूर्ण न शिजवलेला खाऊ नये

दूषित पाणी पिऊ नये, पाणी उकळूनच प्यावे.

GBS Symptoms
Lung Cancer : फुफ्फुसांच्या कॅन्सरची शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं; 99 टक्के लोकं करतात इग्नोर

⁠बाहेरचं, उघड्यावरचं खाणं पिणं टाळायला हवे.कधी कधी आपण कच्च्या भाज्या खातो...मात्र सध्या कच्च्या भाज्या खाऊ नयेत.फक्त शिजवलेले अन्नच खावे, नॉनव्हेज आणि पाणी यातूनच जीबीएसचा धोका जास्त आहे.मात्र, भात, पनीर खाल्ल्याने जीबीएस होतो हा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com