ahilyangar crime news : Saam tv
महाराष्ट्र

धाड धाड...! भर रस्त्यात तरुणावर गोळीबार, अहिल्यानगरमध्ये २४ तासांत दुसरी घटना

ahilyangar crime news : अहिल्यानगरमध्ये भर रस्त्यात तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरमध्ये २४ तासांत दुसरी घटना घडली आहे.

Saam Tv

अहिल्यानगरमध्ये भर रस्त्यात तरुणावर गोळीबार

गोळीबारामध्ये तरुण जखमी

जिल्ह्यात चोवीस तासांत दुसऱ्यांदा गाळोबीर

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत पुन्हा गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. दोन गटाच्या भांडणातून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवस लागोपाठ झालेल्या गोळीबाराने जिल्हा हादरला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. नेवासामध्ये बुधवारी रात्री एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. चोवीस तास उलटत नाही, तोच नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दोन गटाच्या भांडणातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गावात बुधवारी रात्री गोळीबाराच्या घटनेत अबरार शेख गोळी लागून जखमी झाला आहे. तर आज झालेल्या घटनेत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दोन दिवस लागोपाठ झालेल्या गोळीबाराने जिल्हा हादरला आहे.

नेमकं काय घडलं?

महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या वादामधून अबरार शेख या युवकावर नगरमधील राज चेंबर या ठिकाणी गोळीबार झाला. अबरार शेख याला मनपा निवडणुकीच्या वेळेस किरकोळ कारणातून मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी अबरार शेख याने पोलिसांमध्ये तक्रार केली होती. याचा राग मनात धरून अबरार शेख यांच्यावर रात्री अकराच्या सुमारास चार गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

अबरार शेख याच्या कंबरेत गोळी लागल्याने अबरार शेख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) कृष्ण प्रकाश सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर असताना ही घटना झाल्याने पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. जखमी अबरार शेख याने तक्रार केलेल्या आरोपींच्या कार्यकर्त्यांनीच गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT