Ahilyanagar Danewadi youth who was Killed  Saam Tv News
महाराष्ट्र

हत्या करुन मुंडकं, हात-पाय एका विहिरीत, तर धड दुसऱ्या विहिरीत; नगरमधील मृत तरुणाची ओळख पटली

Nagar Danewadi Murder 19 Year Old Youth : १२ मार्च रोजी गावातील एका विहिरीत या तरुणाचं शीर, हात आणि पाय नसलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब होती. त्यामुळे ओळख पटवणे अवघड झालं.

Prashant Patil

नगर : नगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे एका १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माऊली सतीश गव्हाणे असं या तरुणाचं नाव आहे. ६ मार्च रोजी रात्री तो घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता मिळून न आल्याने ९ मार्चला शिरूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, १२ मार्च रोजी गावातील एका विहिरीत या तरुणाचं शीर, हात आणि पाय नसलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब होती. त्यामुळे ओळख पटवणे अवघड झालं. मात्र, काल शेजारच्या विहिरीत शिर, हात आणि पाय पोत्यात आढळून आल्याने मृतदेह माऊलीचाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बेलवंडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले असून लवकर या प्रकरणाचा छडा लागणार असल्याचं नगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितलं.

दरम्यान, या मृतदेहाबाबत अधिक चौकशी केली असता, जबर मारहाण करून आरोपीने हात पाय आणि शिर धडापासून वेगळं केलं होतं. नंतर आरोपीने शरीराचे तुकडे करून दोन्ही विहिरीत फेकून दिले. आधी एका विहिरीत मृतदेहाचे काही तुकडे सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. विहिरीच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत देखील शिर, दोन हात आणि एक पाय आढळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT