Rahuri Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

आई - वडील विभक्त, नातेवाईकाची ४ बहिणींवर वाईट नजर, पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार

Shocking Incident in Rahuri: चार सख्ख्या बहिणींवर नातेवाईकाकडून अत्याचार. आरोपीला अटक. तिघांचा शोध सुरू. राहुरीत खळबळ.

Bhagyashree Kamble

  • राहुरीत ४ सख्ख्या बहिणींवर अत्याचार.

  • एक तरूणी विवाहित.

  • तीन मुली अल्पवयीन.

अहिल्यानगरच्या राहुरीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चार सख्ख्या बहिणींवर नातेवाईकानेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. एकीचं लग्न तर ३ मुली अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

चारही मुली नाशिक येथील रहिवासी आहेत. पीडित मुलींचे आई वडील हे काही कारणास्तव विभक्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या ४ मुली दुरच्या नातेवाईकांकडे राहत होत्या. दूरच्या नातेवाईक त्यांचा सांभाळ करत होता. मात्र, त्या नातेवाईकाचीच चार मुलींवर वाईट नजर होती. त्यानं चारही मुलींवर लैंगिक अत्याचार केला.

एका तरूणीचे नुकतेच लग्न झाले होते. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. ती ३ बहिणींसोबत राहत नव्हती. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आली होती. नंतर तिच्यावरही नराधमानं अत्याचार केला. अल्पवयीन मुलींपैकी एक १६, दुसरी १४, आणि तिसरी १० वर्षांची होती.

नातेवाईकाच्या याच त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे, एका महिलेसह इतर दोन आरोपी, अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला तत्काळ ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT