Ahilyanagar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई! २५ .४३ लाखांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल पकडला

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मिरजगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत स्कॉर्पिओमधून १३२ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करून २५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Alisha Khedekar

  • कर्जत तालुक्यात पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

  • स्कॉर्पिओ वाहनातून १३२ किलो गांजा जप्त

  • दोघांना अटक; मोबाईल आणि वाहनासह मुद्देमाल जप्त

  • जिल्ह्यात ड्रग्सविरोधात पोलिसांची कारवाई अधिक तीव्र

सुशील थोरात, अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अंमली पदार्थविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्ब्ल १३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरजगाव पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथून पाथर्डीकडे जाणाऱ्या एका वाहनातून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मिरजगाव ते कर्जत रोडवरील महात्मा फुले चौक येथे पोलिसांनी सापळा रचला.

ठरलेल्या प्लॅननुसार स्कॉर्पिओ मधून जाणाऱ्या गणेश कराड आणि सुखदेव कदम यांच्या गाडीची तपासणी केली असता डिक्कीत चार गोण्या आढळून आल्या. या गोण्यांमध्ये एकूण १३२.८४ किलो ग्रॅम अंमली पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी १८ लाख १८ हजार रुपये किमतीचा गांजा, २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ७ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन असा एकूण २५ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक करावाया सुरु केल्या असून गेल्या तीन दिवसात MD ड्रग्ससह पोलिसांनी गांजा तस्करीची ही मोठी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT