Shrirampur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Crime : ४२ मिनिटात गाठले पाच ठिकाण; लाखोंचा ऐवज लांबविला, श्रीरामपूरात पहाटेचा थरार

Ahilyanagar News : दाट लोकवस्ती असलेल्या मोरगे वस्ती परिसरात ४ मार्चच्या पहाटेच ५ अज्ञात चोरट्यांनी अवघ्या ४२ मिनिटात परिसरातील ५ ठिकाणी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : श्रीरामपूर शहरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातल्याचे पाहण्यास मिळाले. एकाच रात्रीत मोरगे वस्ती परिसरात पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. अवघ्या ४२ मिनिटात पाच घरांमध्ये जाऊन चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबवला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या मोरगे वस्ती परिसरात ४ मार्चच्या पहाटेच ५ अज्ञात चोरट्यांनी अवघ्या ४२ मिनिटात परिसरातील ५ ठिकाणी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेत परिसरातील विवेक जाधव, सूष्मा बोकन, विठ्ठल वाघ, बाळासाहेब भोजने व प्रशांत जाधव यांच्या येथे घरफोडी झाली असून यातील प्रशांत जाधव यांच्या घरातील ३२ तोळे सोने चोरट्यानी लंपास केल्याची माहिती समोर आली.

चोरटे सीसीटीव्हीत कैद 
मोरगे वस्ती येथील पाच ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला. मात्र एकाच वेळी ५ ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी; अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. 

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

श्रीरामपूर शहरातील पहाटेच्या सुमारास 5 अज्ञात चोरट्यांनी या घरफोड्या केल्या आहेत. पाच ठिकाणी चोरी झाली असून यात कोणत्या ठिकाणाहून किती रक्कम व दागिने चोरीला गेले आहेत. याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरामध्ये झालेल्या चोरीच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनोख आंदोलन

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT