महाराष्ट्र

Ahilyabai holkar : स्त्रीशक्तीचा होणार जागर; अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू उलगडणार, नव्या सीरीजला सुरुवात

Chitra Wagh video series on ahilyabai holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद सदस्या चित्रा वाघ यांनी “अहिल्याईचा उदो उदो” या विशेष व्हिडीओ सिरिजची सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chitra Wagh: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद सदस्या चित्रा वाघ यांनी “अहिल्याईचा उदो उदो” या विशेष व्हिडीओ सिरिजची सुरुवात केली आहे. २० मे २०२५ पासून ही मालिका त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर दररोज प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू नव्याने जाणून घेण्याची संधी मिळत आहे.

या व्हिडीओ मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वावर, समाजकारणातल्या त्यांच्या भुमिकेवर, तसेच स्त्रीशक्ती, प्रशासनिक दृष्टिकोन, सामाजिक समता आणि मूल्याधिष्ठित नेतृत्व यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यशैलीचा आजच्या काळातील संदर्भात घेतलेला आढावा ही मालिकेची जमेची बाजू आहे.

या व्हिडीओ मालिकेमुळे नव्या पिढीला इतिहासातील एका सशक्त स्त्रीने घडवलेल्या परिवर्तनाचे महत्त्व समजण्यास मदत होत आहे. महिलांना प्रेरणा देणारी ही सिरिज केवळ माहितीपर नसून, जनजागृतीसाठीही उपयुक्त ठरत आहे.

या व्हिडीओ मालिकेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तसेच चित्रा वाघ यांच्या कथा सांगण्याचे कौशल्याचे नेटकरी कौतुक करत अहिल्या आई चा उदो उदो, अप्रतिम अशा कमेंट करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : दादांशिवाय पुण्यात राज्यात काम करणे अवघड- मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar Death: अजित पवारांचा जन्म कुठे झाला? जाणून घ्या त्यांचे सुरुवातीचे जीवन

Ajit Pawar Death : कार्यकर्त्यांना जपणारा नेता....उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death : अजित पवारांचं फोनवरून शेवटचं बोलणं कुणासोबत झालं?

Ajit Pawar passed away: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, Raj Thackeray यांनी ट्विट करत अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT