Jamkhed accident, CNG explosion 
महाराष्ट्र

Accident : भल्या पहाटे कार डिव्हायडरला धडकली, CNG चा स्फोट, पोलिस अधिकाऱ्यासह २ जणांचा होरपळून मृत्यू, जामखेड हादरलं!

Jamkhed Accident : भल्या पहाटे कारने डिव्हायडरला धडक दिली. त्यानंतर सीएनजीने पेट घेतला.. अपघात इतका भीषण होता की आतमधील दोन जण जळून खाक झाले आहेत. अहिल्यानगरमधील जामखेड येथे हा अपघात झालाय.

Namdeo Kumbhar

सुशील थोरात

Jamkhed accident, CNG explosion : अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये आज पहाटे दुर्देवी घटना घडली आहे. कार डिव्हायडरला धडकल्यामुळे सीएनजीने पेट घेतला अन् दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतामध्ये जामखेड पोलिस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बीडहून जामखेडच्या दिशेने येणाऱ्या कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. भीषण धडक बसल्यानंतर सीएनजीने पेट घेतला अन् कारला भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल अशी मृताची नावे आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजता अपघात झाला.

आग इतकी भीषण होती, की कार जळून खाक झाली. गाडीत जळून मृत्यू झालेल्या मध्ये जामखेडचे पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल व जामखेड मधील साईनाथ पान शॉपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश आहे. कारने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला धडक दिली, त्यानंतर १५० फूटावर कार फरफटत गेली होती. त्यामुळे सीएनजीने पेट घेतला, अन् कारमध्ये आग लागली.

कार अत्याधुनिक असल्यामुळे अपघातानंतर लॉक झाली, त्यामुळे आतमध्ये असणाऱ्या दोघांना बाहेर पडता आले नाही. कारबरोबर दोघेही जळून खाक झाले, त्यांना ओळखणेही शक्य झाले नाही. मोबाईलवरून ओळख पटवण्यात आली. अपघातात पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल पडलेला होता, त्यामुळे ते एक असावेत व गाडी मालक काळे असे दोघे असावेत असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT