Ahamdanagar Accident News Saam Digital
महाराष्ट्र

Ahamdanagar Accident News: शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत घुसला कंटेनर, २ भाविकांचा जागीच मृत्यू

Ahamdanagar Accident News: शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारानजीक घटली आहे. या भीषण अपघातात 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे

Sandeep Gawade

Ahamdanagar Accident News

शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारानजीक घटली आहे. या भीषण अपघातात 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक पुणे महामार्गावर हा अपघात घडला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती . दरम्यान ट्रक चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला आणि हा ट्रक या दिंडीमध्ये घुसला. यामुळे तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊ वारकरी जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासनाला केल्या आहेत. त्यानंतर तातडीने मदत पोहोचवण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT