Ahamadnagar News Saam TV
महाराष्ट्र

भयंकर घटना! चाऱ्यातून विषबाधा; शेतकऱ्याच्या ११ गाई दगावल्या

गाईंच्या शरीरात ऑक्सलेट हे विषारी द्रव्य आढळून आल्याने विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आलंय.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे, साम टिव्ही

Ahamadnagar News : चाऱ्यामधून विषबाधा झाल्याने ११ गाईंचा मृत्यू तर अनेक जनावरे अत्याव्यस्थ झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यात घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी (Farmer) रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यात लहान-मोठी २९ जनावरे आहेत. विषबाधेमुळे दोन दिवसातच त्यांच्याकडील तब्बल ११ गाया दगावल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Ahmadnagar News Today)

गाईंच्या शरीरात ऑक्सलेट हे विषारी द्रव्य आढळून आल्याने विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आलंय. त्याच चारा म्हणून दिलेल्या उसात नायट्रेटचे प्रमाण आढळून आल्याने नाइट्रिक पॉयझनिंग झाल्याचे देखील निष्पन्न झालंय. गोठ्यातील जनावरे देखील अत्यवस्थ असल्याने पशुवैद्यकीय डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टर इतर गायांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (Ahmadnagar News Marathi)

जनावरांसाठी चारा म्हणून बाजारातून ऊस खरेदी करताना शहानिशा करणे गरजेचे आहे. कारण उसावर विविध विषारी द्रव्य फवारलेली असू शकतात. परिणामतः जनावरांना विषबाधा होण्याचा धोका निर्माण होतो. एकीकडे लम्पिचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे विषबाधेमुळे रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यात गाईंच्या मृत्यूचे तांडव बघायला मिळत असल्याने गोपालक शेतकरी धास्तावले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT