Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

CM Fadnavis: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळेल १० तास वीज अन् बीलही येणार कमी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Agriculture News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलीय. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. याशिवाय वीज बिलही कमी येणार आहे.

Bharat Jadhav

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. शेतीसाठी दिवसा वीज मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. शेतकऱ्यांच्या या समस्येची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा वीज देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आता दिवसा १० तास वीज मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येथील आर्वी येथील एका कार्यक्रमात बोलताना विजेबाबत त्यांनी मोठी घोषणा केलीय.

महाराष्ट्र पहिलं राज्य

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्यात येणार आहे. तसेच विजेचे बिल कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. विजेचे बिल दर ५ वर्षांनी कमी करून दाखवणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिलं राज्य ठरलं असल्याचेही मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यातील ८० टक्के भागात आता लवकरच दिवसा १० तास वीज उपलब्ध करून देण्यात येईल.

लोअर वर्धा प्रकल्पावर ५०० मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारला जातोय. वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. येथील नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली असून फडणवीसांनी येथील गावकऱ्यांचे अभिनंदन केलंय. वर्ध्यातील आमदार-खासदारांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत, त्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिलेत.

दिवसा १० तास वीज मिळेल

दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाईल, असे आश्वसन निवडणुकीच्या वेळी देण्यात आले होते. त्याची पूर्तता महायुती सरकारकडून केली जात आहे. राज्यातील ८० टक्के भागात दिवसा १० तास वीज दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलीय.

विहीर पुनर्भरण योजना राबवण्यात येत आहे, त्याचा फायदा होणार असून त्यातून विहिरीतील पाण्याची पातळी वाढेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बार्शी उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आलीय. शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - कॉन्स्टेबल मंजू मालिका आता ''इन्स्पेक्टर मंजू" नावाने 29 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला.

८ महिन्यांपूर्वी जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती; वर्दळीचा रस्त्यावर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या उडाल्या चिंधड्या, नेमकी कुठं घडली घटना?

Farali Chivda Recipe : नवरात्रीत उपवासाला घरीच बनवा कुरकुरीत फराळी चिवडा, रेसिपी आहे अगदी सोपी

Marathwada Floods : पाऊस थांबेना, संकट संपेना! मराठवाड्यावर पावसाचं सावट कायम, हवामान विभागाने काय इशारा दिला?

Maharashtra Politics: पुण्यात भाजपची फिल्डिंग, पण दणका देणार अजित पवार; बड्या नेत्याची होणार घरवापसी

SCROLL FOR NEXT