Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपूरमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा; ११ लाखांचा साठा जप्त

Pandharpur : पंढरपूरजवळील कासेगाव येथे बनावट रासायनिक खत तयार करणाऱ्या कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकली. ११ लाख रुपयांच्या साठ्यासह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • पंढरपूरजवळील कासेगावमध्ये बनावट खत तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई

  • महालक्ष्मी फर्टिलायझर एलएलपीच्या नावाने ७०० पोती बनावट खत जप्त

  • तीन आरोपींविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त छापेमारी; तपास सुरू

पंढरपूर जवळील कासेगाव परिसरात बनावट रासायनिक खत तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याशी आणि शेतीच्या उत्पादनक्षमतेशी थेट संबंधित असलेल्या अशा गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने कृषी विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

कासेगावमधील विठ्ठल खत कारखान्यात ही बनावट खत निर्मिती सुरू होती. महालक्ष्मी फर्टिलायझर एलएलपी या कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या खतांची विक्री थेट शेतकऱ्यांना करण्यात येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात विविध कंपन्यांच्या नावाने बनावट खताची ७०० पोती तयार केली जात होती. या खतांची एकूण किंमत सुमारे ११ लाख १२ हजार रुपयांपर्यंत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाला या कारखान्याबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. कारवाई दरम्यान साठवलेले खत हे कुठल्याही नियमांनुसार रजिस्टर्ड नव्हते आणि त्यात रासायनिक प्रमाणांची अचूकता होती. बनावट खतांची विक्री केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण भविष्यातील उत्पादनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील सुदीप सुरेश साळुंखे, अहमदनगर जिल्ह्यातील हंडी निमगाव येथील योगेश बाळकृष्ण जाधव आणि पंढरपूरजवळील विठ्ठल खत कारखाना यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी रासायनिक खत आदेश, १९८५ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम २, ३ आणि ७ नुसारही कारवाई करण्यात आली आहे.

या धाडसत्रामुळे बनावट खत विक्रीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं असून, हा प्रकार केवळ आर्थिकच नव्हे तर कृषीक्षेत्राच्या दृष्टीनेही गंभीर गुन्हा मानला जात आहे. शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीसाठी अशा प्रकारांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यानंतर आणखी काही ठिकाणी अशाच कारवायांचे संकेतही मिळत असून, बनावट खत विक्रीसंदर्भात सखोल तपास सुरू आहे.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सेंद्रिय व रासायनिक खतांच्या गुणवत्तेवर शंका निर्माण झाली असून, शासनाने विक्री प्रक्रियेवर अधिक कडक नियम लावावेत, अशी मागणी होत आहे. कृषी खात्याच्या या कारवाईमुळे बनावट खत विक्री करणाऱ्या टोळ्यांमध्ये घबराट पसरली आहे. शेतकऱ्यांनी आता खत खरेदी करताना अधिक सजग राहणे, पॅकिंगवरील माहिती तपासणे आणि शंका असल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT