अभिजित घोरमारे
भंडारा - धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन भंडारा जिल्हा भाजप तर्फे आज भंडारा जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला टाळा ठोकून आंदोलन करण्यात आले. टाळा ठोकल्या नंतर संबंधित कार्यालयाची चावी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपुर्द करण्यात आली. ह्यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. Agitation Of BJP in Bhandara Over Farmers Demand
हे देखील पहा -
या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांना अद्यापही बोनस चा लाभ मिळाला नाही, शिवाय नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन भत्ता मिळणार होता, तो देखील मिळाला नसल्यामुळे हि योजना पूर्णपणे फसवी होती. असा आरोप भाजपने केला आहे.
राज्य सरकारकडून अद्यापही उन्हाळी धान्यमालाची उचल केली गेली नाही, त्या शिवाय धन्यासाठी लागणाऱ्या बारदाण्याची देखील मोठी टंचाई आहे. अश्या प्रकारच्या अनेक समस्या घेऊन आंदोलन करण्यात येत असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. या व अश्या प्रकारच्या अनेक मागण्या सोडवण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले, असून सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे असे भाजपचे कार्यकर्ते म्हणाले.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.