अकोल्यात इंधन गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात इंधन गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

अकोल्यातील तुकाराम चौक परिसरात आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला - केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलन पुकारले आहे. अकोल्यातील तुकाराम चौक परिसरात आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. Agitation by NCP against fuel and gas price hike in Akola

हे देखील पहा -

सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडला पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात आंदोलन करण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं होते. त्यानुसार अकोल्यातही आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील तुकाराम चौक परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे. प्रचंड महागाईने गोरगरीब माणसाचं पार कंबरडं मोडलं आहे. आठ कोटी बीपीएल धारक नागरिक महागडे सिलेंडर भरून आणू शकत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने हा अन्याय केला असल्याचा आरोप मिटकरी यांनी केलाय. स्मृती इराणी यांच्यावरही आमदार मिटकरी यांनी जोरदार टीका केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: दिवाळीचा फराळ महागात पडणार? 'या' राशींच्या व्यक्तींना आजारांचा सामना करावा लागणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Satara Doctor Case : मोगलाई व्यवस्थेनं घेतला डॉक्टरचा बळी? प्रशांत बनकरला बेड्या, गोपाळ बदने कधी होणार गजाआड? VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकला पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट

SRK Film Festival: 'देवदास' ते 'जवान', शाहरुख खानचे 'हे' चित्रपट पुन्हा होणार थिएटरमध्ये प्रदर्शित

Nitin Gadkari: ‘घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन, भाजपमधील इनकमिंगवर गडकरींचा टोला

SCROLL FOR NEXT