Dhule aghori Saam Tv News
महाराष्ट्र

Black magic in Dhule: कापलेला बोकड, जिवंत कोंबड्या अन् लिंबू, स्मशानभूमित अघोरी प्रकार; धुळे थरथरलं

Aghori Rituals in Dhule: धुळ्यातील मोहाडी परिसरात अघोरी प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही मांत्रिकांनी स्मशानभूमित अघोरी प्रकार केला आहे. रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळ्यातील मोहाडी परिसरात अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. काही मांत्रिकांनी स्मशानभूमिमध्ये रात्रीच्या वेळीस अघोरी पूजा केली आहे. स्थानिक नागरीकांना या अघोरी घटनेची माहिती मिळताच त्यांनी घडलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्याठिकाणी कापलेला बोकड, जिवंत कोंबड्या, तसेच लिंबू आणि काही फोटो सापडले आहेत. हे कृत्य करून मांत्रिक पसार झाले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपाल करीत आहेत.

धुळ्यातील मोहाडी परिसरात अघोरी प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही मांत्रिकांनी स्मशानभूमित अघोरी प्रकार केला आहे. रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. स्मशानभूमीमध्ये एक कापलेला बोकड, जिवंत कोंबड्या, तसेच मोठ्या प्रमाणात कापलेले लिंबू आणि काही फोटो त्या ठिकाणी आढळले आहे. अघोरी प्रकार केल्यानंतर मांत्रिक पसार झाले आहेत. ही अघोरी पूजा कशा संदर्भात सुरू होती याचा तपास अद्याप लागला नाही.

या धक्कादायक कृत्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी निषेध व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांकडे मागणी केली. ज्या प्रकारे पोलीस ठाण्याच्या आवारातील हिस्ट्री सीटर यांची यादी पोलीस ठाण्यात तयार केली जाते, त्याच प्रकारे पोलीस ठाण्याच्या आवारातील अघोरी पूजा विधी करणार्‍यांची देखील यादी तयार करण्यात यावी.

तसेच त्यांना या संदर्भात मज्जाव घालण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. या अघोरी कृत्यामुळे मोहाडी परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच स्थानिक नागरीकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. हा अघोरी प्रकार आणखीन कुठे घडला आहे का? तसेच मांत्रिकांचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT