Onion Auction Stopped Saam TV
महाराष्ट्र

Onion Auction Stopped: ...तर एकही कांदा बाहेर जाऊ देणार नाही; निर्यातबंदीविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने, रास्ता रोको आणि निषेधाच्या घोषणा

Aggressive Onion Farmers: केंद्र सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. अशात निर्यातबंदी मागे घेतली नाही तर, जिल्ह्यातून एकही कांदा बाहेर जाऊ दिला जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय.

Ruchika Jadhav

अजय सोनवणे, मनमाड

Onion Auction:

केंद्र सरकारने कांद्यावर ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यात बंदी लागू केली आहे. यामुळे नाशिकसह राज्यात विविध जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंदची हाक दिलीये. केंद्र सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. अशात निर्यातबंदी मागे घेतली नाही तर, जिल्ह्यातून एकही कांदा बाहेर जाऊ दिला जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कांदा निर्यातबंदीविरोधात स्वाभिमानीचा रास्ता रोको

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले. सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. काल ठिकठिकाणी आंदोलने झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी नगर-नाशिक महामार्गावर विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला.

गारपीटीच्या तडाख्यातून शेतकरी सावरत असताना आणि कांद्याला चांगला दर मिळत असताना, अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. सरकारने निर्यातबंदी मागे घेतली नाही तर, जिल्ह्यातून एकही कांदा बाहेर जाऊ दिला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला.

याआधी केंद्र सरकारने निर्यातशुल्कासह कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केली. तसेच आता सरकारने कांद्याच्या निर्यातीवर पूर्णत: बंदी घातली. त्याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळतायत. सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर १८ ते २८ रुपयांनी गडगडल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र नगरमधील कांदा बाजारात आजही लिलाव सुरळीत होता.

काही महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते. पुढे काही दिवसांनंतर ते हटवून कांद्याचे निर्यात मूल्य ८०० डॉलर करत निर्यातीवर अप्रत्यक्ष नियंत्रण राखले गेले. या संपूर्ण परिस्थितीत निर्यातीचे प्रमाण कमी झाले. असे असताना आता पूर्णपणे बंदी घातल्याने दरात घसरण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

नगर कांदा (Onion) बाजारामध्ये कांद्याचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत निर्यात बंदी ऊठलीच पाहिजे अशा घोषणा देऊन केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. सकाळी नगर बाजार समितीत लिलावाला सुरुवात झाली यावेळी आदल्या दिवशीच्या तुलनेत अठरा ते अठ्ठावीस रुपये कमी दर असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामतीच्या तानाईनगरमध्ये गुलाबी मतदान केंद्राची निर्मिती

Suraj Chavan Dance Video: 'ये गो ये मैना' गाण्यावर सूरज चव्हाणचा बायकोसोबत डान्स, व्हिडीओ पाहून कौतुक कराल

Trump Controversy : भारत आणि चीन नरकासारखे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नवा वाद

Viral Video : बाप रे! रिक्षाचं स्टेअरिंग अल्पवयीन मुलाच्या हातात, पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; Video व्हायरल

Raja Shivaji Cast Fees: रितेश देशमुख ते संजय दत्त; 'राजा शिवाजी' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT