Shivsena/ NCP
Shivsena/ NCP Saam TV
महाराष्ट्र

अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती; सेनेच्या पराभवा‌नंतर राष्ट्रवादीने जबाबदारी झटकली

भारत नागणे

पंढरपूर : राज्यसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उमेदवाराचा पराभवाबाबत‌ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती, निवडणुकीचे मॅनिटीरिंग देखील शिवसेनेकडेच होतं असं सांगत, शिवसेनेच्या पराभवा‌बद्दल मंत्री जयंत पाटील यांनी चक्क हात वर केल्याचं दिसतं आहे.

मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आज माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे पाझर तलावांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी‌ राज्यसभा (Rajyasabha) निवडणूक निकालावर ही प्रक्रिया दिली आहे. आज दिवसभर राज्यसभा निवडणुकीतील जय पराजराची चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी मात्र पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी मारले आहे.

महाविकास आघाडीसोबत असलेल्या पाच ते सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केले नाही. परंतु त्यांची आताच नावं घेणं योग्य होणार नाही ‌‌असं सांगत आमदार संजय शिंदे आणि देवेंद्र भोयर यांची देखील त्यांनी यावेळी पाठराखण केली.

हे देखील पाहा -

आम्ही सर्व जण पहिल्या पसंतीच्या मताकडे लक्ष दिले पण दुसऱ्या पसंतीच्या मतांनी आमचा घात केला. आजही पहिल्या पसंतीची १६३ मते महाविकास आघाडीसोबत असून सरकारला कोणताही धोका नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं असलं तरीही, पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अपक्ष आमदारांची जबाबदारी ही शिवसेनेकडे (Shivsena) होती असं सांगतं या पराभवाला आपण जबाबदार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या पराभवाला सर्वस्वी सेनाच जबाबदार आहे का अशा चर्चांना आता उधान आलं आहे.

एकीकडे जयंत पाटील यांनी अपक्ष आमदारांची जबाबदारी सेनेकडे होती सांगितलं आहे तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ज्यांनी दगा दिला, त्या अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करावा लागेल तसंच आतापर्यंत अपक्ष आमदारांना झुकत माप दिलं, विकासाच्या कामे आमच्या बरोबरीने करवून घेतले आणि कालच्या निवडणुकीत मतदान करताना विचार केला गेला नाही. यापुढे अपक्ष आमदारांना (Independent MLA) निधी देताना विचार केला जाईल असा इशारा दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT