Bomb threat in mahanagri Express  
महाराष्ट्र

Train Bomb Threat : मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब, त्या मेसेजनंतर एकच खळबळ, पण...

Bomb threat in mahanagri Express after Delhi explosion : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

  • दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार स्फोटात १३ मृत, २० जखमी झाले आहेत.

  • स्फोटानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यात हाय अलर्ट जारी.

  • महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश शौचालयात आढळला.

  • जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर गाडीची तपासणी, मात्र बॉम्ब सापडला नाही.

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Maharashtra on High Alert After Red Fort Car blast : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याने देशात अनेक ठिकाणी हायअलर्ट जारी केला आहे. कार ब्लासमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास कसून केला जात आहे. दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी केला आहे. पोलिसांकडूनही महत्त्वाच्या ठिकाणी कठोर सुरक्षा तैनात केली जातेय. दिल्ली ब्लास्टमुळे महाराष्ट्र हाय अलर्टवर असतानाच महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा एक मेसेज आला अन् एकच खळबळ उडाली.

महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ उडाली. एक्सप्रेसमधील एका कोचच्या शौचालयात हा संदेश लिहिलेला आढळला आहे. पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय यासह गाडीमध्ये बॉम्ब असल्याचा हा संदेश असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली आहे. एक्सप्रेस बॉम्ब असल्याची बातमी पसरताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. एक्सप्रेसची तपासणी जळगाव आणि भूसावळ स्थानकावर करण्यात आली. महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश आढळून आल्याने रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबईहून वाराणासीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती एका व्यक्तीने दिली. त्यानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनवर गाडी येताच या गाडीची रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. श्वानपथकाच्या माध्यमातून देखील संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली. मात्र गाडीमध्ये काही आढळून आले नसल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली असून संपूर्ण गाडीच्या तपासणीनंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.

अज्ञात व्यक्तीने महानगरी एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद.. ट्रेनमध्ये बॉम्ब आहे, असा संदेश लिहिला होता. एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना सांगितले. त्यानंतर जळगाव आणि भुसावळमध्ये एक्सप्रेसचा कसून तपास करण्यात आला. पण कोणतीही वस्तू आढळली नाही. रेल्वेकडून अफवांवर विश्वास ठेवू नका, असा मेसेज प्रवाशांना देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाईचा बर्थडे..! सांगलीत 'मुळशी पॅटर्न', १० जणांसोबत स्टेजवर गेला, गुप्तीने अंगावर केले वार, वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड

Pune News : पुण्यात निवडणुकीची रणधुमाळी, नगरपरिषद - नगरपंचायतींसाठी धुरळा उडाला, कोणामध्ये होणार लढत?

Weight Loss Biryani Recipe: वजन कमी करणारी बिर्याणी! न्यूट्रिशनिस्टने सांगितला हेल्दी फॉर्म्युला, आताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Grated Carrots : गाजर न किसता बनवता येईल हलवा, फॉलो करा 'ही' सिंपल ट्रिक

SCROLL FOR NEXT