Navneet Rana on Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Navneet Rana: 'ही मॅच फिक्स होती', ठाकरेंच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा यांनी सरळ त्या प्रसंगाची करून दिली आठवण

Navneet Rana on Uddhav Thackeray: ज्यांनी बाळासाहेबांना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विचारधारेसाठी काम करताना पाहिलं, आज त्यांचा विजय झाला आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Navneet Rana on Uddhav Thackeray:

जे महाराष्ट्राला अपेक्षित होतं आणि ज्यांनी बाळासाहेबांना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विचारधारेसाठी काम करताना पाहिलं, आज त्यांचा विजय झाला आहे, असं अपक्ष खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत. साम टीव्हीशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत.

त्या म्हणाल्या की, ''हा निकाल बाळासाहेबांना मानणाऱ्या लोकांच्या बाजूने लागला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जी संविधानाला धरून सत्ता स्थापन केली होती, त्याचा निकाल आज लोकांनी पाहिला आहे. आम्हाला आणि देशातील लाखो लोकांना हा निकाल अपेक्षित होता.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ शिंदे आणि नार्वेकरांनी पाठित खंजीर खुपसला असं निकाल आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना त्या म्हणल्या की, त्यांनी भाजपाच्या पाठीत काय खूपसले? 2014 आणि 2019 मध्ये कोणाच्या भरोशावर त्यांनी निवडणूका लढवल्या? सकाळ झाली की मुख्यमंत्री बदलतील. सकाळ झाली की हे लोक इकडे जातील. निकाल येऊ द्या मग आम्ही बोलू, असं हे लोक म्हणत होते. मात्र त्यांची आता बोलती बंद झाली आहे.'' (Latest Marathi News)

ही मॅच फिक्स होती, असं निकालानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन म्हणाले होते. यावर नवनीत राणा म्हणाल्या आहे की, 2019 मध्ये तुम्ही काय केलं होतं? कोणासोबत मॅच फिक्सिंग केली होती? बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध जाऊन तुम्ही कोणासोबत बसले होते? त्यांनी हे उत्तर आधी दिलं पाहिजे.

त्या म्हणाल्या ''देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी नियमाप्रमाणे संविधानाला हाताशी घेऊन 40 आमदारांना आपल्या सोबत घेऊन जी सत्ता स्थापन केली होती, ती महाराष्ट्राच्या विकासासाठी केली होती.'' राणा म्हणल्या, कोणी काय केलं त्याचे उत्तर 2024 मध्ये मिळेल. जे लोक म्हणतात की 22 तारखेला अयोध्येमध्ये जाण्याची गरज नाही. त्यांनाही प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT