Uddhav Thackeray and Eknath Shinde reunite Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

Uddhav Thackeray Shiv Sena split : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. एनडीएच्या नव्या रणनीतीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटीत पुन्हा फूट पडण्याची चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde Uddhav Thackeray political updates : पश्चिम बंगालमधील राजकीय उलथापालथीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेतील संख्याबळ आणि ताकद वाढवण्यासाठी 'एनडीए'ने (NDA) मोठी रणनीती आखल्याचे समोर आले आहे. याचा थेट फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसण्याचे संकेत आहेत. एनडीएच्या या नव्या खेळीमुळे शिवसेना युबीटी (UBT) गटामध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडू शकते, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत फूट पडली आहे. पश्चिम बंगालच्या आमदारांनंतर खासदारांनीही बंड केले आहे. २० खासदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय सत्ताधारी आघाडी म्हणजे एनडीए इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून लोकसभेत आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचून आपला कायदेविषयक अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. ममता बॅनर्जी यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातही फूट पडू शकते, असे सांगितले जात आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने एनडीएच्या सूत्रांचा हवाला देत याबाबतचे वृत्त दिले आहे. आता फुटीच्या धोक्यात असलेल्या पक्षांपैकी उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा एक पक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या प्रचंड विजयापासून यावर चर्चा सुरू आहे, पण आता याला अधिकच जोर आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या ९ खासदार आहेत.

लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ९ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार सदस्यत्व वाचवण्यासाठी सहा खासदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा सर्वात संभाव्य पर्याय मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. 'ऑपरेशन टायगर'द्वारे ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांना अथवा विरोधातील अनेक नेत्यांना आपल्या बाजूने आणण्यात शिंदेंना यश आले आहे. तर दुसरीकडे उद्धव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर मुंबईपुरताच मर्यादित राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update : पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी होणार खुलं

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी चेक करा नवीन दर; जाणून घ्या प्रमुख शहरांतील किमती

Heart Failure: हार्ट फेल्युअर म्हणजे नेमकं काय? काय असतात याची सुरुवातीची लक्षणं

Success Story : जिद्दीला सलाम! वयाच्या २३ व्या वर्षी तब्बल १९ स्पर्धा परीक्षांमध्ये यश; चारू पांडेची थक्क करणारी यशोगाथा

SCROLL FOR NEXT