भंडारा, धुळे नंतर आता 'हा' जिल्हा कोरोनामुक्त Saam Tv
महाराष्ट्र

भंडारा, धुळे नंतर आता 'हा' जिल्हा कोरोनामुक्त

कोरोना जिल्ह्यातून अखेर हद्दपार झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून नवीन कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या शून्य झाली असून उपचार सुरू असलेले सर्व रुग्ण Patients आता बरे झाल्याने आता जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 37 हजार 700 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 36 हजार 750 लोकं या आजारातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून Hospital सुट्टी देण्यात आली आहे. तर 950 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्हावासीयांना सोळो की पळो करून सोडणारा कोरोना जिल्ह्यातून अखेर हद्दपार झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

हे देखील पहा -

जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्या दरम्यान बेड मिळत नसलेले कोविड केअर सेंटर खाली झाले आहे. अत्यंत कमी सोयीसुविधा आणि तोकडी आरोग्य व्यवस्था असतानाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किरण सातपुते व कोविड इन्चार्ज डॉ. राजेश वसावे यांनी गेल्या दीड वर्षात एकही सुट्टी न घेता मोठ्या मेहनतीने कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार देण्याची जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर ऑक्सीजन प्लांटची निर्मिती तसेच ऑक्सिजनच्या बचतीसाठी सुरु केलेली ऑक्सिजन सिस्टर पद्धत संपूर्ण राज्यात नंदुरबार पॅटर्न म्हणून राबवली गेली. 

नंदुरबार जिल्ह्यात आजच्या स्थितीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही हे आरोग्य यंत्रणेचे मोठे यश असून नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे  पालन केले. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली आहे. यापुढे देखील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केल्यास जिल्हा कोरोनामुक्त होईल व येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करता येईल. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेऊन नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT