सहा वर्षांनी आज चंद्रपूरकरांचा घसा होणार "ओला" ! संजय तुमराम
महाराष्ट्र

सहा वर्षांनी आज चंद्रपूरकरांचा घसा होणार "ओला" !

6 वर्षानंतर चंद्रपुरात पुन्हा एकदा दारू विक्रीला प्रारंभ होणार आहे.

संजय तुमराम

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूरकरांची प्रतीक्षा एकदाची संपली आहे ! चंद्रपुरात आज मद्यपींसाठी 'सोनियाचा दिनू' आहे. मद्यशौकीन ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस आज उजाडला आहे. After 6 years, liquor sales will start again in Chandrapur

1 एप्रिल 2015 रोजी जिल्ह्यात दारू बंद झाली होती, तर 27 मे 2021 च्या राज्य सरकारच्या आदेशानुसार ती पुन्हा सुरू होत आहेत. उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केलेले दारू परवाने 3 ठिकाणाहून सिंगल विंडो पद्धतीचा वापर करत अत्यंत विद्युतगतीने पूर्ण केले आहे. मद्य शौकिनांसाठी प्रतीक्षा असलेल्या या बाबीसाठी आज जिल्हाभरात 100 हून अधिक बार रेस्टॉरंट आणि काही दारू दुकाने खुली होणार आहेत.

हे देखील पहा-

6 वर्षानंतर चंद्रपुरात पुन्हा एकदा दारू विक्रीला प्रारंभ होणार आहे. शहरातील हॉटेल आणि बार मालकांनी आपापली प्रतिष्ठाने सज्ज केली आहेत. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने 490 परवानेधारकांपैकी चौकशीनंतर 98  दारू परवाने नियमित करून मान्यता प्रदान केली.

आज दुपारनंतर नागपूरहून बोलावण्यात आलेल्या दारूसाठ्यातून दारू वितरण होऊ शकणार आहे. सकाळपासून दारू विक्री सुरू झाली का, याचा अदमास घेण्यासाठी शौकिनांची हॉटेल्सपुढे घुटमळ बघायला मिळत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT