अहमदनगर ः कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मराठा समाजाचे राज्यभरात मोर्चे निघाले. सर्व वातावरण ढवळून निघाले होते. संबंधित खटल्यातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. आरोपींनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे खटला लांबत चालला आहे. आता या खटल्यातील सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनीच विनंती अर्ज केला आहे.
या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी यासाठी यादव यांनी न्यायालयास पत्र पाठवले आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या खटल्यातील तीनही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात अर्ज केला होता.Advocates' application for early hearing of kopardi case
या खटल्यातील आरोपी संतोष भवाळने शिक्षेविरोधात कोर्टात अपील दाखले केले. नंतर त्याने मुंबई न्यायालयात स्वतंत्र याचिका केली. हा खटला मुंबईला वर्ग केला जावा, अशी विनंती केली होती. पुढे राज्य सरकारचा अर्ज आणि भवाळचे अपील मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाले. या खटल्यातील उर्वरित दोन आरोपींनी अपील केले.
या खटल्याची सुनावणी नियमित घेण्याबाबत न्यायमूर्ती रणजीत मोरे यांनी सूचना केल्या होत्या. परंतु फेब्रुवारी २०२०पासून ती झालेली नाही. ही रखडलेली सुनावणी लवकरात लवकर केली जावी, यासाठी या खटल्यातील सरकारी वकील यादव यांनी उच्च न्यायालयास अॉनलाईन अर्ज केला आहे, त्यात त्यांनी लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली आहे.Advocates' application for early hearing of kopardi case
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.