अहमदनगर ः कोरोनाने गेल्या दोन वर्षांपासून कुस्तीसोबत सर्वच खेळांचे कंबरडे मोडले आहे. पैलवान खुराकालाही मोताद झाले आहेत. त्यांना चार पैसे मिळावेत यासाठी नगर जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी नवीन संकल्पना आणली आहे. अहमदनगर कुस्ती प्रिमिअर लिगच्या माध्यमातून पैलवानांना व्यासपीठ तर मिळेलच परंतु ते मालामालही होतील.
स्पर्धेच्या लोगोचे अनावरण काल (मंगळवारी) पारनेर येथील श्रीशिवछत्रपती कुस्ती संकुलात अर्जुन पुरस्कारप्राप्त काकासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, महान भारत केसरी पै.विजय गावडे, श्रीशिवछत्रपती कुस्ती संकुलाचे पै.युवराज पठारे, पै.धनंजय जाधव,पै.महेश जाधव, पै.नानासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, पै. रामभाऊ नळकांडे आदी उपस्थित होते.Wrestling Premier League to be held in Ahmednagar
जिल्हा तालिम संघाच्या माध्यमातून लांडगे यांनी महिला कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, उत्तर महाराष्ट्र केसरी आदी स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्या होत्या. कुस्ती दंगल स्पर्धाही त्यांच्याच संकल्पनेतून उतरली होती. चित्रपट कलाकारांनीही टीम विकत घेतल्या होत्या.
काका पवार काय म्हणाले...
कोरोनामुळे पैलवान व कुस्तीचे अतोनात नुकसान झाले. लोकवर्गणीमधून होणारी मैदाने यापुढे लवकर होणे अशक्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिक लिगमुळे कुस्ती क्षेत्रात पुन्हा ऊर्जा येईल. वैभव लांडगे यांचा उपक्रम राज्यात दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी केले.
श्रीगोंदा पारनेर पॉवर - पै.युवराज पठारे, कर्जत जामखेड मावळे - विजूकाका तोरडमल, संगमनेर अकोले योद्धे - बबलूशेठ धुमाळ या मान्यवरांनी टीम घेतल्या आहेत. इतर 3 संघाची लवकरच विक्री लवकरच होईल.Wrestling Premier League to be held in Ahmednagar
कसे असेल स्पर्धेचे स्वरुप?
सदर कुस्ती लीग मध्ये एकूण 6 संघ असतील.
प्रत्येक संघात 5 मुले व 1 महिला मल्ल असतील यासह 1 परराज्यातील खेळाडू.
वजनगट : पुरुष मल्ल 58,65,74,84,120. महिला मल्ल : 51
डिसेंबर 2021 मध्ये नगरमध्ये या स्पर्धा होतील.
प्रत्येक संघाची किंमत 10 लाख. यातील 7 लाख रूपये खेळाडूंसाठी असतील.
राज्यात लिग करणार
आतापर्यंत आजोबा पै.छबुराव लांडगे यांच्या प्रेरणेतून कुस्तीसाठी उपक्रम राबवित आलो आहे. नगरच्या मल्लांसाठी ही नवीन लीग घेऊन आलो आहोत. या स्पर्धेतून खेळाडूंना चार पैसे मिळतील. कार्पोरेट स्वरूप आले तरच कुस्ती टिकेल, राज्यात अशा लिग व्हाव्यात. कोणी पुढे न आल्यास आम्ही हा प्रयोग कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबवू.
- पै.वैभव लांडगे, अध्यक्ष जिल्हा तालिम संघ, नगर.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.