आदिवासी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये. 
महाराष्ट्र

नगरमध्ये काँग्रेसला पुन्हा वैभवाचे दिवस

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे. अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या, आदिवासी, इतर मागासवर्गीय व महिला आघाडीच्या विविध 61 कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष सुरेशराव झावरे, काँग्रेस नेते मीनानाथ पांडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.Admission of tribal activists in the Congress party

या प्रसंगी अकोले तालुक्यातील मीनाक्षी शेंगाळ, मारुती शेंगाळ (पाडळणे), संतोष गायकवाड, रोहिदास पवार, पोपट कोटकर, बाळासाहेब कोटकर, मीराबाई भोईर, रोहिणी पवार, संगीता पवार, मंदा बर्डे यांसह आदिवासी, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती व महिला आघाडीच्या 61 पदाधिकारी महिला व कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला .

मंत्री थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. या पक्षाने कायम गोरगरीब व आदिवासींच्या विकासासाठी काम केले आहे. श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी सातत्याने जन माणसांच्या विकासाचे धोरण घेतले आहे. या उलट भाजपा सरकार भांडवलदारांसाठी काम करीत आहे. म्हणून सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व भूलथापांना कंटाळली आहे. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा ओढा वाढला आहे. तरुणांना या पक्षामध्ये मोठी संधी आहे.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, देशात भाजपा सरकारने जनतेला फसवले आहे. पेट्रोल डिझेलची भरमसाठ होत आहे. गोरगरिबांसाठी काही होत नाही. नगरमध्ये पुन्हा काँग्रेसला वैभवाचे दिवस येत आहेत.

मीनानाथ पांडे म्हणाले की, अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका राहिला आहे. काँग्रेस पक्षामध्ये आगामी काळात अनेक कार्यकर्ते सामील होणार आहे.Admission of tribal activists in the Congress party

महिला आघाडीच्या मीनाक्षी शेंगाळ म्हणाल्या, आम्ही ज्या पक्षात होतो तेथेही प्रामाणिकपणे काम केले. परंतु काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष आहे. नामदार बाळासाहेब थोरात हे सर्वमान्य नेतृत्व आहे. त्यांनी कधीही अकोले-संगमनेर भेद केला नाही. अकोल्यातील जनता नामदार बाळासाहेब थोरातांवर प्रेम करीत आहे. यापुढील काळातही अनेक महिला व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सामील होणार आहेत. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी केले तर सुरेश झावरे यांनी आभार मानले.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT