Aditya Thackreay  
महाराष्ट्र

चिपळूणात आदित्य ठाकरेंनी मदतीच्या पॅकेजचे दिले संकेत

अमोल कलये

चिपळूण : चिपळूण आता हळूहळू सावरू लागले आहे. पुराच्या दरम्यान सर्वांनी चांगले काम केले आहे. सद्यस्थितीत सर्वतोपरी मदत केली जात आहे. चिपळूणमध्ये 20 हजार टन कचऱ्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. आरोग्यच्या दृष्टीने कॅम्प घेतले जात आहेत. त्यामुळे प्राथमिक स्वरूपात सरकार सर्व गोष्टीने तात्काळ मदत करत आहे. आगामी काळात नुकसानग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचा विचार असल्याचे संकेत पर्यावरणमंत्रि आदित्य ठाकरे यांनी येथे दिले. (aditya-thackreay-pacakage-flood-affected-area-chiplun-sml80)

पुरजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सध्या चिपळूण दौ-यावर आहेत. त्यावेळी ते बाेलत हाेते. प्रारंभी आदित्य यांच्या हस्ते विविध भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी भेटीगाठी दरम्यान लहान मुलांना आवुर्जन काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना मुलांनी दिलखूलास उत्तरे दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले चिपळूणमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे याची कल्पना आम्हांला आहे. आता मदतीचा ओघ सुरु देखील झाला आहे. सरकार जनतेला वा-यावर सोडणार नाही. प्रत्येकाला मदत ही मिळणार आहे. अधिकारी वर्ग पंचनामे करीत आहे. खरंतर पंचनाम्यांचे काम काम वेगाने सुरु आहे. पंचनामे पुर्ण झाल्यानंतरच आपल्यासा नुकसानीचा आकडा कळेल. दरमयान नुकसानग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचा मानस आहे. यावेळी लवकरच एखाद्या पँकेजची घोषणा केली जाईल असे संकेतही ठाकरे Aditya Thackreay यांनी येथे दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuvraj Singh : क्रिकेटच्या मैदानात एकाच वेळी 'दादा'गिरी आणि 'दरारा'; सिक्सर किंग युवराज सिंगवर मोठी जबाबदारी

2029 मध्येही काँग्रेसचा चौथ्यांदा पराभव होणार; अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान

Maharashtra News Live Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला; हल्लखोर महिलेकडून चाकू जप्त

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

SCROLL FOR NEXT