'सरकारने मोबाईल वरील फोटो हा पंचनामा समजावा'

devendra fadnavis
devendra fadnavis
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कृष्णाकाठच्या गावांची पाहणी करत आहेत. वाळवा येथील अंकलखोप येथे फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी फडणवीस म्हणाले या पुरामुळे आणि कोरोनामूळे बारा बलोतेदार उध्वस्त होत आहे. तसेच मागच्या वेळी सारखी मदत कशी मिळेल त्यासाठी सरकार कडे प्रयत्न करू. सरकार पंचनाम्याच खूळ माग लावलं आहे. पण यंत्रणा पोहचली नाही तर नुसता मोबाईलवर एक फोटो काढावं आणि मोबाईलवरील एक फोटो पंचनामा समजावा असे फडणवीस यांनी नमूद केले.

सांगली sangli जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis कृष्णाकाठच्या गावांची पाहणी करत आहेत. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे फडणवीस यांनी शेतक-यांची, पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यावेळी खासदार संजयकाका पाटील उपस्थित हाेते. फडणवीस म्हणाले एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन आपण मदतीचा निर्णय घेतला. दाेन वर्षांपुर्वी आपल्या गावावर संकट आले हाेते. त्यावेळी आपण शेतक-यांना सर्वप्रकारची मदत करण्यासाठी प्रयत्न केले.

आता पुन्हा आपल्या गावावर अस्मानी संकट आले आहे. अखेरीस पुन्हा एकदा एनडीआरएफचे काही नियम असतता. त्या नियमातून निधी येत असताे. राज्य सरकराने परिस्थिती पाहून या परिस्थितीत अध्यादेशाच्या पलीकडे जाऊन अध्यादेश काढायचा असताे. गतवेळी आपण साडे बावीस काेटी रुपये अंकलखाेपला नुकसानभरपाई दिली. आज पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काेणाची शेती वाहून गेली, काेणाचे घराचे, दुकानाचे नुकसान झाले आहे. तुम्हा सर्वांना नुकासन भरपाई मिळाली पाहिजे हा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील.

devendra fadnavis
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले...

त्यापुर्वी वाळवा येथील पूरग्रस्त भागाची पाहणी फडणवीस यांनी केली. त्यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपुराचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

पूरग्रस्तांशी फडणवीस यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. राज्य सरकारकडून अधिक मदत मिळविण्यासाठी आम्ही आग्रही राहू असे आश्वासित केले. याबराेबरच केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली असून पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये असे नमूद केले. या संकटातून बाहेर पडाल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com