अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले...

devendra fadanvis ajit pawar
devendra fadanvis ajit pawar

राज्याचे विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सातारा, सांगली, काेल्हापूर या भागातील पूरग्रस्त, दुर्घटनाग्रस्त भागांना भेटी देत आहेत. या भेटी दरम्यान ते त्या त्या भागातील जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. सध्या राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज आहे. ती सरकराने द्यावी असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्यात अनेक माेठे आणि महत्वाचे प्रश्न असल्याची टिप्पणी फडणवीस यांनी केली. (devendra-fadanvis-comment-on-ajit-pawar-uddhav-thackreay-maharashtra-sml80)

राज्याच्या दाैरा करताना विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे विविध माध्यमांना मुलाखती देत त्यांची भुमिका मांडत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

जूलै महिन्यात ज्यांचा वाढदिवस असताे ती राजकीय व्यक्ती मुख्यमंत्री हाेते या प्रश्नावर फडणवीस म्हणाले तुम्ही असं म्हणत असाल तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अधिक आनंद हाेईल. त्यांचा ही वाढदिवस जूलै महिन्यात आहे. त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी अनेकदा हुकली आहे असे फडणवीस यांनी एका प्रश्नावर नमूद केले.

तुम्ही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या का? हाे, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. एक गाेष्ट लक्षात घ्या,आम्ही राजकीय विराेधक आहाेत. वैयक्तिक वैरी नाही. उद्धव ठाकरे आणि आम्ही २५ वर्षे मित्र हाेताे. राजकीय वाटचाल वेगळी आहे. आत्ता देखील मी उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी कधीही त्यांना फाेन करु शकताे.

तुम्ही दादांविषयी आणि त्यांनी तुमच्याविषयी लिहिले तुमच्या devendra fadanvis ajit pawar दाेघांत नाते कसे आहे या प्रश्नावर फडणवीस म्हणाले एका वृत्तपत्राने आम्हांला दाेघांना एकमेंकाविषयी लेख मागितला. अजित पवारांनी माझ्याविषयी आणि मी त्यांच्याविषयी लिहिले हे खरे आहे. त्यांचे महाराष्ट्राच्या विकासात याेगदान आहे. वेगवेगळ्या पदांवर ते राहिले आहेत. त्यांच्या कामाची शैली आहे. एकूण त्यांनी महाराष्ट्रात दिलेल्या याेगदानाबाबत लिहिणे हे गैर नाही. त्यांनी देखील माझ्याबद्दल लिहिले.

अजितदादांचे मुख्यमंत्री पद हुकले, त्यांच्या मुख्यमंत्री हाेण्याच्या क्षमता आहेत या प्रश्नावर फडणवीस म्हणाले अजितादादांच्या मुख्यमंत्री पदापेक्षा सध्या महाराष्ट्रात माेठे प्रश्न आहेत. त्याप्रश्नावर सध्या आपण चर्चा केली पाहिजे.

सध्या काेविड १९ च्या प्रादुर्भावाचे कारण सांगून महाराष्ट्राची प्रगती थांबली आहे. एक वर्ष महाराष्ट्र थांबताे म्हणजे पाच वर्ष महाराष्ट्र मागे पडताे असे फडणवीस यांनी नमूद केले. राज्याच्या हितासाठी राज्यकर्त्यांनी धडाडीचे निर्णय घ्यायचे असतात. कधी रिस्क घ्यायची असते कधी टिका सहन करायची असते. ते काेठे तरी घेतले पाहिजेत अशी अपेक्षा फडणवीस यांनी नमूद केले.

devendra fadanvis ajit pawar
बागवाडी, नलावडेवाडी, खादट, भोईवाडीत मदतीसाठी सरसावली 'जिजाऊ'

स्वतंत्र नाेडल समिती असावी

सध्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत आहेत. त्याचा अभ्यास करण्याचे काम करीत असते. सरकार अभ्यास गट नेमते. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालास गांभीर्याने पाहिले जात नाही. सन २००५ ला पूर आल्यानंतर निष्कर्ष शोधायला लागलो. त्यातून काही साध्य झाले नाही. सन २०१९ मध्ये पूर आला. त्या वेळी पुन्हा आम्हाला त्याची आठवण झाली. त्याच दरम्यान अनेक अभ्यासकही त्याचा अभ्यास करतात. त्यांचे अहवाल प्राप्त होत असतात. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अशा अहवालांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र नाेडल समिती असावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com