बागवाडी, नलावडेवाडी, खादट, भोईवाडीत मदतीसाठी सरसावली 'जिजाऊ'

chiplun
chiplun
Published On

चिपळूण : महाराष्ट्र झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पुराचा मोठा फटका कोकणातील जनतेला बसला आहे. या प्रसंगी कोकणवासियांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने कोकणात मदतकार्य हाती घेतले आहे. (ngo-helps-residents-chiplun-remote-areas-sml80)

कोकणातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पथक चिपळूणमध्ये दाखल झाली आहेत.

या पथकाने बागवाडी, नलावडेवाडी, खादट भोईवाडी, नवीन कोलकेवाडी, पेठमाप आदी गावांमध्ये मदतकार्य हाती घेतले. सुमारे पाच हजार कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य किट, १० हजार ब्लॅंकेट, पाच हजार पाण्याच्या बाटल्या, औषधे, लहान बालकांसाठी बिस्कीटे, दूध पावडर व आदी जीवनावश्यक साहित्य दिले. या पुढील काही दिवसांत जिजाऊची टीम पुरग्रस्तांना आणखी मदतीचे वाटप करेल असेही त्यांनी नमूद केले.

कोकणासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करण्याचा संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचा मानस आहे. त्यामुळेच या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिजाऊ संस्थेचे २५ स्वयंसेवक ४ रुग्णवाहिकांसह पुढील काही दिवस मदत कार्यात सक्रिय राहून येथील नागरिकांना आधार देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे केदार चव्हाण (सचिव , जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था) यांनी सांगितले.

chiplun
Tokyo Olympics प्रवीणचे आव्हान संपुष्टात; भारतीयांची निराशा

कोकणातील chiplun जनता संकटात असताना जिजाऊ संस्थेसारखे मदतीला येणारे शेकडो हात येथील जनतेला नक्कीच उभारी घेण्यास प्रेरणा देणारे ठरले आहेत अशी भावना येथील स्थानिक नागरिकांनी मदत करणा-या जिजाऊ संस्थेबद्दल व्यक्त करुन संस्थेचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com