Shivsena Saam Tv News
महाराष्ट्र

Aditya Thackeray: 'पंतप्रधान मोदींची इच्छा असेल तर, आदित्य ठाकरेंना कधीही अटक होईल', कुणी केला दावा?

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray: 'ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होईल, त्या दिवशी आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते', असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्त्यांनी केला आहे.

Bhagyashree Kamble

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते, असा दावा त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मुख्य म्हणजे 'ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होईल, त्या दिवशी आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते', असं देखील तिवारी म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

'आदित्य ठाकरे तुम्ही मंत्री होता. तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना, दिशा सालियानच्या घरी पार्टी होती. त्यावेळी सालियाननं आत्महत्या केली होती. त्यावेळी पार्टी अडेंट करण्यासाठी आदित्य ठाकरे गेले होते. मी नसतो तर, आदित्य ठाकरे यांना अटक झाली असती, मी त्यावेळी मीडियाला दाखवून दिलं, हे भाजपचे कटकारस्थान चालू देणार नाही'.

'आदित्य ठाकरे यांना आजही अटक होऊ शकते. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होईल, त्या दिवशी आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते', असा खळबळजनक दावा तिवारी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT