महाराष्ट्र

Aditya Thackeray : दसरा मेळाव्यात गेली १४ वर्ष आपण भाषण का केलं नाही? आदित्य ठाकरेंनी सांगितली अजब प्रथा

Bharat Jadhav

दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सरकारवर तोंडसूख घेतले. शिंदे सरकार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आज शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना आदित्य ठाकरेंनी भाषणासंदर्भातील एक प्रथा सांगितली.

आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी १४ वर्षात पहिल्यांदा दसरा मेळाव्यात भाषण केलं. आपण भाषण का केलं नाही यामागील कारण सांगितांना एक प्रथा सांगितली.वर्षातील मोठा दिवस दसरा असायचा. लहानपणी दसऱ्याच्या दिवशी आज्याचं भाषण ऐकायचो. खाली मैदानावरील गवतावर बसून आम्ही भाषण ऐकायचो. त्यानंतर वडिलांचं भाषण ऐकू लागलो. त्यानंतर युवा सेना अध्यक्ष आणि नंतर शिवसेना सदस्य म्हणून स्टेजवर बसून भाषण ऐकत होतो. याच स्टेजवर युवा सेनेची स्थापना झाली. त्याला तुम्ही प्रेम दिलं.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या हातात तलवार दिली आणि माझ्या मनगट्टात ताकद दिली. गेली १० ते १२ वर्ष शिवसेना नेता म्हणून या स्टेजवर येत असतो आणि वडिलांचे भाषण ऐकत असतो. इतकेच नाहीतर वडिलांची म्हणजेच मुख्यमंत्र्यांची शपथविधी सुद्धा पाहिलीय. पण १४ वर्षात मी कधी भाषण केल नाही. कारण एक प्रथा आहे, वडील सुद्धा संजय राऊत यांच्या वडिलांसमोर भाषण करत नव्हते. मी सुद्धा वडिलांसमोर कधी भाषण करत नाही, आता उद्धव ठाकरे येतील तेव्हा मीही माझे भाषण थांबवणार.

परिवर्तन घडवण्याची वेळ आलीय

आजचा दिवस हे वर्ष २०२४ महत्त्वाचं आहे. माझ्यावर आजोबा,पणजोबांचा आशीर्वाद आहे. त्यांनी सांगितलं की, आदित्य हा क्षण खूप महत्त्वाचं आहे. हे साल खूप महत्त्वाचं आहे.येणारी लढाई खूप महत्त्वाची आणि खूप मोठी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ज्या मतदारसंघात परिवर्तन घडावयचे आहे तो क्षण आलाय. ते साल आले आहे. दोन वर्षापासून राज्यातील निवडणूक कधी लागतील यांची प्रतिक्षा आपण पाहतो होतो,तो क्षण आलाय, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddique Accuse EXCLUSIVE: बाबा सिद्दिकींवर गोळी झाडणारा हाच 'तो' आरोपी; पाहा व्हिडिओ

Baba Siddique Death : घटनेची जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावे, महायुती सरकारवर शरद पवार संतापले

Who is Baba Siddique: नगरसेवक ते मंत्री.. मुंबईमधील बाहुबली नेता, बॉलिवूडमध्येही दबदबा; कोण होते बाबा सिद्दीकी?

CM Eknath Shinde : बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचं हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले कारवाईचे आदेश

Baba Siddiqui Firing: मुलाच्या कार्यालयाबाहेरच मारेकऱ्यांनी झाडल्या गोळ्या, असा घडला बाबा सिद्धिकींवरील गोळीबारचा थरार

SCROLL FOR NEXT