MLA Shahajibapu Patil News Saam TV
महाराष्ट्र

...त्यामुळे ठाकरेंनीच आमदारकीचा राजीनामा द्यावा; शहाजी बापू पाटील यांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यामुळे दररोज सकाळी होणारी किरकिर आता बंद झाली - शहाजी बापू पाटील

भारत नागणे

पंढरपूर : शिवसेनेचे चाळीस आमदार एकत्रित असल्याने आमचं बहुमत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, उलट बहुमत गमावलेल्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह उर्वरित १५-१६ आमदारांनीच राजीनामा देवून पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) आमची असल्याचे सांगण्यासाठी राज्यभरात निष्ठा यात्रा सुरु केली आहे.

पाहा व्हिडीओ -

निष्ठा यात्रेदरम्यान बंडखोर ४० आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केल्याचा आरोप करत, त्या ४० आमदारांनी राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवावं असं खुलं आव्हान आदित्य यांनी दिलं आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर देताना आमदार शहाजी पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आधी तु्म्ही राजीनामा देवून पु्न्हा निवडून येऊन दाखवा असे प्रतिआव्हान दिलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यामुळे दररोज सकाळी होणारी किरकिर आता बंद झाली आहे. त्यामुऴे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण शांतपणे चालू राहिल असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. संजय राऊत यांचे हात स्वच्छ असते तर त्यांना अटक झाली नसती, काही तरी काळंबेरं असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना अटक झाली असल्याचे सांगत त्यांच्या अटकेच समर्थनही त्यांनी केले.

आमचं बहुमत आहे. आम्ही राजीनामे देणार नाही. तुम्हीच पंधरा सोळा जण उरलेले आहात. आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित आमदारांनी राजीनामे द्यावेत. तुमची आमदारकी शाबूत ठेवणार आणि आमच्या मागे लागणार का असा सवालही आमदार पाटील यांनी उध्दव व आदित्य ठाकरे यांना उद्देश यांना उद्देशून केला. कायद्याची पुस्तकं वाचा जरा असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवण्यासाठी मोठं काम केले आहे. इतिहास देखील एक दिवस हे मान्य करेल. महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. त्यांचं पटलं नसतं, तर त्यांच्या सभेला कोणी काम धंदा सोडून आले नसते. संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचा दावाही आमदार पाटील यांनी केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी 'ही' 5 कामं नक्की करा; घरात लक्ष्मीचं होईल आगमन

Gold Rate: १० वर्षात १ लाखानं वाढलं सोनं, २०१५ मध्ये किती रूपये तोळा होतं गोल्ड? वाचा १०० वर्षाचा इतिहास

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा असंवेदनशीलतेचा कळस, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस!

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; समोर आली अपडेट

SCROLL FOR NEXT