Aaditya Thackeray Speech Saam TV
महाराष्ट्र

Aaditya Thackeray News : मी गद्दार गँगचं कौतुक करायला आलोय; आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

Aaditya Thackeray Speech : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील जनप्रक्षोभ यात्रेतून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Aaditya Thackeray News : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील जनप्रक्षोभ यात्रेतून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. एका बाईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जाते. तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या जातात. तिला हाताला धरून खेचलं जातं आणि माफी मागायला लावली जाते. आज मी इथे गद्दार गँगच्या नेत्याचं कौतुक करायला आलो आहे, की तुमच्यावर नेमके कसले संस्कार झाले आहेत? अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे. (Latest Marathi News)

इतकंच नाही तर, रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मोठा इशारा देखील दिला आहे. हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही. तर काही तासांचं आहे. त्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर गद्दार गँगचे जे आयपीएस, आयएएस आणि इतर अधिकारी आहेत, त्यांच्याविरोधात बदल्याच्या भावनेतून नाही तर लोकांसाठी आम्ही चौकशी करु आणि जेलभरु. त्यांना जेलमध्ये टाकू, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.  (Maharashtra Political News)

सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या ठाण्यातील कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला आहे. यावेळी घेतलेल्या सभेतून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

"आज मी इथे गद्दार गँगच्या नेत्याचं कौतुक करायला आलो आहे. तुमच्यावर नेमके कसले संस्कार झाले आहेत? तुमच्या-माझ्या ठाण्याला त्यांनी काल एका दिवसात भयानक पद्धतीने बदनाम केलं आहे. एका बाईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जाते. तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या जातात. तिला हाताला धरून खेचलं जातं आणि माफी मागायला लावली जाते. खरंतर तुम्ही माफी मागण्याच्या लायकीचे नाहीत आणि माफ करण्याच्याही लायकीचे नाहीत", अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली. (Breaking Marathi News)

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "या महिलेचा गुन्हा काय होता तर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. एकीकडे दोन रुपयांसाठी अनेक ट्रोल्स आमच्यावर घाणेरडी टीका करत आहेत. हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांकडून एक शब्दही नाही. पुढे जाऊन त्याच महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळं तुम्हाला चालणार आहे का?", असा सवाल उपस्थितांना विचारत आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीचा निकाल घोषित करु नये- औरंगाबाद खंडापीठात याचिका

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT