Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी, २१०० रुपये, बोगस लाभार्थी... लाडकी बहीण योजनेवर मंत्री आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Vidhansabha: आज विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा झाली. या योजनेबाबत आदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे. योजनेच्या लाभार्थी किती आहेत, लाभार्थ्यांच्या क्रॉस व्हेरिफिकेशनबाबत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत चर्चा

आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार- आदिती तटकरे

राज्यात सध्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा झाली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेत सुरुवातीपासून किती लाभार्थी होते, याबाबत माहिती दिली आहे.

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? (Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana)

आदिती तटकरे यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला रजिस्ट्रेशनवेळी २ कोटी ६३ लाख ८३ हजार ५८९ अर्ज आले होते. यापैकी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज स्विकारण्यात आले होते. यामधील २६ लाख अर्ज बाद झाले, असे तुम्ही बोलत आहात. ही संख्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिली होती. एखादा विभाग जेव्हा एखादी योजना राबवतो तेव्हा इतर विभागांचा डेटा हा त्यांच्याकडे नसतो.हा डेटा आपल्याला त्या-त्या विभागाकडून मागवला जातो.

लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते. नमो शेतकरी योजना कृषी विभागाकडून राबवली जाते. या योजनेचा डेटा आम्हाला जानेवारीत प्राप्त झाला. यामधून नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळतात. उरलेले ५०० रुपये हे लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. असाच डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मागवला होता. त्यांनी २६ लाखांचा डेटा दिला. हा डेटा तपासला गेला. या २६ लाख महिलांपैकी फक्त ४ लाख डेटाची तपासणी करणे आवश्यक होते. बाकीचे लाभार्थी हे पात्र होते.त्यामुळे त्यांना लाभ सुरु आहे.

बोगस लाभार्थ्यांवर आदिती तटकरे काय म्हणाल्या?

८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. नियमानुसार, ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे परत घेण्याचे काम गेल्या ५-६ महिन्यांपासून सुरु आहे.१२ हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला आहे. अनेक महिलांचे स्वतःचे बँक अकाउंट नाहीये. त्यांचे आधार कार्ड पती किंवा वडिलांच्या बँक अकाउंटशी लिंक आहे. त्यांचे स्वतःचे अकाउंट नसल्याने त्यांनी पुरुषांच्या अकाउंटवर लाभ घेतला. यामुळे त्यांचे व्यवस्थित तपासणी केली जात आहे.

ई केवायसीबाबत आदिती तटकरें काय म्हणाल्या?

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण १३ बाबी असतात. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी ७-८ महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर आता ई केवायसी प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर या योजनेबाबतचा सुरळीतपणा लवकरच होईल.

लाडकी बहीण योजनेच्या अटींबाबत महत्त्वाचे विधान

लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अशी अट नव्हती, असं जयंत पाटील यांनी सभागृहात म्हटलं होतं. त्यावर आदिती तटकरेंनी उत्तर दिले.लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात या सर्व अटी दिल्या होत्या.ऑक्टोबर-नोव्हेंबर डिसेंबर कालावधीत आचारसंहिता होती. त्यामुळे तपासणी होऊ शकली नव्हती. यानंतर पुन्हा जानेवारीमध्ये सर्व विभागांकडून डेटा मागवला गेला. यानंतर कॅॉस व्हेरिफिकेशन पुन्हा सुरु केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: अपात्र असतानाही ₹१५०० घेतले, कारवाई होणार का? आदिती तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Weight loss: वजन कमी करायचं आहे? मग मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी करा 'ही' योगासन

ICC Ranking: दो भाई, दोनों तबाही! ICC वनडे रँकिंग पाहून रोहितच्या चाहत्यांना धडकी भरेल

BP Control Tips: थंडीत बीपी वाढतोय? नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये १९ लाखांचा पानमसाला- साठा जप्त FDA ची धडक छापेमारी

SCROLL FOR NEXT