ADANI SATARA PROJECT ROW saam tv
महाराष्ट्र

अदानींना मोठा धक्का; प्रकल्पाचं काम बंद ठेवण्याचे वनविभागाचे आदेश

Adani's 1,500 MW Power Project in Maharashtra: वन विभागानं साताऱ्यातल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश दिलेत. ही कारवाई का करण्यात आलीय? अदानीचा हा वीज प्रकल्प वादात का सापडलाय?. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Rohit Kadam

साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रकल्पाला धक्का बसलाय. कंपनीचा सुमारे 1500 मेगावॅट क्षमतेचा प्रस्तावित प्रकल्प वनविभागानं बंद पाडलाय. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची रीतसर परवानगी मिळवण्याआधीच कंपनीनं प्रकल्पाचं काम सुरू केल्याचं उघडकीस आलंय. इतकंच काय, प्रकल्पाच्या मूळ खर्चात फेरफार करून तब्बल 227 कोटी रुपये वाचवल्याचा गंभीर आरोप कंपनीवर केला जातोय. कंपनीनं टॅक्स वाचवण्यासाठी प्रकल्पाची किंमत 100 पटीनं कमी दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर काही तासांतच वन विभागानं कंपनीला थेट नोटीस बजावलीये. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला दिलेल्या वन विभागाच्या काम बंदच्या आदेशात काय म्हटले आहे ते पाहूयात...

आदेशात काय?

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी नसताना प्रकल्पाचं काम कुठल्या अधिकारात आणि कशाच्या आधारे सुरू केलं याचा 3 दिवसांत लेखी खुलासा करा

प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वृक्षतोडीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याची रीतसर परवानगी घेण्यात आलीय का?

परवानगी असल्यास किती झाडं तोडण्याची परवानगी घेण्यात आलीय?

परवानगीचं मूळ आणि साक्षांकित परवानगी पत्र तसंच प्रकल्पाशी संबंधित इतर सर्व वैधानिक मंजुरीची कागदपत्रं आणि नकाशे मुदतीत सादर करावेत

समाधानकारक खुलासा आणि आवश्यक परवानगीची कागदपत्रं सादर न केल्यास किंवा काम सुरू ठेवल्याचं आढळल्यास कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार

कोयना वन्यजीव संवर्धन क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येतोय.

सुरूवातीला अदानीचा या प्रकल्पाची किंमत 5 हजार 675 कोटी रुपये होती. त्यामुळे वन्यजीव खर्चापोटी प्रकल्पाच्या किमतीच्या 4 टक्के रक्कम म्हणजे 227 कोटी रुपये वन्यजीव प्राधिकरणाकडे जमा करणं बंधनकारक होतं. मात्र, कंपनीनं अचानक मूळ प्रकल्पाची किंमत थेट 99 पटीनं कमी करून 56 कोटी 75 लाख रुपये दाखवली. त्यामुळे कंपनीला केवळ 2 कोटी 27 लाख रुपयेच द्यावे लागणार होते. मात्र प्रकल्पाच्या बदलेल्या किंमतीविरोधात तक्रार केल्यानंतर अदानीचा हा प्रकल्प वादात सापडला.

मात्र, प्रकल्पाचा कोणताही भाग संरक्षित वन क्षेत्राच्या हद्दीत येत नसल्याचं सांगत कंपनीने आरोप फेटाळलेत. तर दुसरीकडे, तक्रारादारांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये. त्यामुळे वन विभागाच्या नोटीशीला अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड काय उत्तर देणार?... कंपनीनं आकड्याचा खेळ करून सातारकरांची शुद्ध फसवणूक केली आहे का? यामुळे कंपनीवर नेमकी काय कारवाई होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सूरत–नवसारीदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना

मुंबईतील उड्डाणे नवी मुंबईला नेण्यावरून अदानी एअरपोर्ट आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद?

जन्मदाताच बनला मुलांचा वैरी! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले; छत्रपती संभाजीनगर हादरले

Water Crisis : कल्याण-डोंबिवलीकरांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट; दर गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

लाल नऊवारीत अक्षया हिंदळकरचा शाही थाट; मराठमोळ्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा!

SCROLL FOR NEXT