अमरावती - शासनाच्या आदेशावरून जिल्ह्यात सुरू असलेल्या मोहीमेअंतर्गत शिक्षकांना देखील लसीकरण करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर देखील ज्या शिक्षकांनी स्वतःचे लसीकरण केले नाही,त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा शिक्षणाधिकारी यांनी दिला आहेे. याबाबत चौदाही गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती मागण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हे देखील पहा -
कोरोनावर मात करण्यासाठी लस हाच प्रतिबांधात्मक उपाय असल्याने शंभर टक्के लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. याबाबत जिल्हास्तरावर मोहीम राबवुन ३० नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. यात शासकीय कर्मचाऱ्यांना लास घेण्याची सक्ती करण्यात आली होती. याशिवाय जे कर्मचारी लसीकरण करणार नाहीत, त्यांना वेतन मिळणार नाही असा फतवा देखील सिईओंनी काढला होता.
सोबतच शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभुमिवर शिक्षकांना लसीकरणाची सक्ती करण्यात आली असताना आणि याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना दिले आहेत. मात्र काही शिक्षकांकडून या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी खान म्हणाले.जे शिक्षक लसीकरण करणार नाहीत त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्याचा इशाराही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.शिक्षकांनी तत्काळ लसीकरण करून त्याचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करण्याच्या सुचना देखील शिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.