तुळजाभवानी मंदिरातील तीर्थकुंड हड्पणाऱ्यांवर कारवाई होणारच ! SaamTv
महाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिरातील तीर्थकुंड हड्पणाऱ्यांवर कारवाई होणारच !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

~ कैलास चौधरी

तुळजापूर : तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरातील तीर्थकुंड हडप केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवण्यात आले असून तीर्थकुंड हडपणारे भाजप नेते देवानंद रोचकरी यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.

मात्र, या आदेशाला आव्हान देत देवानंद रोचकरी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवानंद रोचकरी यांना दिलासा दिला होता. परंतु या प्रकरणात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान समाधानकारक उत्तरे रोचकरी यांच्याकडून मिळाली नसल्याने जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जे आदेश दिले होते तेच आदेश आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कायम ठेवण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

त्यामुळे या प्रकरणात मंकावती तीर्थकुंड हडपणारे भाजप नेते देवानंद रोचकरी यांना दिलासा मिळणार नसून त्यांच्यावर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशान्वये फौजदारी कारवाई होणे आता जवळपास निश्चित झाले आहे.

काय आहे तीर्थकुंड प्रकरण ?

तुळजापूरची तुळजा भवानी हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहे. देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक वर्षातून एकदा का होईना इथे दर्शनासाठी येतोच. या धार्मिक व ऐतिहासिक स्थळामधील प्रत्येक जागा भाविकभक्तांसाठी पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे.

याच तुळजाभवानी माता मंदिर परिसरात एक पुरातन तीर्थकुंड असून, मंकावती तीर्थकुंड या नावाने ते प्रसिद्ध आहे. मात्र, हे तीर्थकुंड वारसाहक्काने आपल्याकडे आले असून हे तीर्थकुंड आपल्या खाजगी मालमत्तेचा भाग असल्याचा दावा करून भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी हडपले आहे.

धार्मिक ग्रंथात आणि पुराणात उल्लेख असलेले हे तीर्थकुंड खासगी कसे काय होऊ शकते, असा भाविकांचा सवाल आहे. तुळजाभवानी मंदिरासमोरील परिसरात तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराचे हे मंकावती कुंड आहे. या कुंडाची महती स्कंद पुराणात आहे. तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणातही या कुंडाचा उल्लेख सापडतो. या कुंडावर पूर्वी भाविक स्नानासाठी जात. परंतु नंतरच्या काळात हे कुंड खासगी असल्याचा दावा भाजप नेते देवानंद रोचकरी यांनी केला आहे. त्यामुळे तेथे कोणी स्नानासाठी जात नाही. त्या परिसरात रोचकरी यांनी खासगी बांधकामही केलंय.

याबाबत स्थानिक व भाविकांनी आवाज उठविल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून, हे कुंड हडपणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. आता याच आदेशाला कायम ठेवून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांना एकप्रकारे दिलासाच दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT